Superstar Rajnikant to work with Sanjay Jadhav? | सुपरस्टार रजनिकांत संजय जाधव यांच्यासोबत करणार काम?

दक्षिणेतील सुपरस्टार रजनिकांत यांचा नुकताच वाढदिवस झाला. दिग्दर्शक संजय जाधव यांनी सुपरस्टार रजनिकांत यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फोटो जुना फोटो आहे असं अजिबात वाटत नाहीये. रजनिकांत आणि संजय जाधव यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीचा हा फोटो आहे, असं या फोटवरून आपल्याला कळतेय. या फोटो सोबत लिहिलेले कॅप्शन देखील उत्सुकता वाढवणारे आहे. या कॅप्शनमध्ये संजय जाधव यांनी लिहिले आहे की, Happy Birthday @superstarrajini. Sir.. aap jiyo hazaaro saal. I m lucky I could meet you in person in this life." (सुपरस्टार रजनीसर तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जियो हजारो साल... तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला मिळाले यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.) 
जगभरातील चाहत्यांनी सुपरस्टार रजनिकांत यांना त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या आणि या चाहत्यांमध्ये अनेक कलाकारांचा देखील समावेश असतो हे विशेष सांगण्याची गरज नाही. परंतु दिग्दर्शक संजय जाधव यांनी रजनिकांत यांच्यासोबतचा हा फोटो पोस्ट केल्यामुळे रजनिकांत यांच्यासोबत संजय जाधव भविष्यात काम करणार आहेत का या चर्चेला उधाण आले आहे.  
सध्या येरे येरे पैसा या आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेले संजय जाधव आपला पुढचा चित्रपट सुपरस्टार रजनिकांत यांच्या सोबत करणार का? संजय जाधव यांच्यामुळे रजनिकांत चक्क मराठी सिनेमात दिसणार का? अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत. 
संजय जाधव यांनी दुनियादारी यासारखा अतिशय हिट चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिला आहे. चेकमेट, प्यार वाली लव्ह स्टोरी, तु ही रे या त्यांच्या चित्रपटाची देखील चांगलीच चर्चा झाली आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही त्यांची मालिका तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. त्यांनी नुकतेच टू मॅड या कार्यक्रमाचे परीक्षण देखील केले होते. 

Also Read : ​मुलाखत घ्यायला गेलेल्या तरुणीवर रजनिकांत झाले होते फिदा

Web Title: Superstar Rajnikant to work with Sanjay Jadhav?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.