Sumedh Mudgalkar will be seen in Madhukari's bucket list | ​ माधुरी दिक्षितच्या बकेट लिस्टमध्ये झळकणार सुमेध मुद्गलकर

'डान्स महाराष्ट्र डान्स' त्यानंतर 'डान्स इंडिया डान्स सिझन ४', 'दिल दोस्ती डान्स' आणि सम्राट अशोका यांसारख्या मालिका आणि रिअॅलिटी शो मधून अभिनेता सुमेध मुद्गलकर हा घराघरात पोहोचला. इतकंच नव्हे तर अगदी कमी वयात सुमेधचा भला मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. उत्तम डान्स करण्यासोबतच त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने सुमेधने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्याने व्हेंटिलेटर आणि मांजा यांसारख्या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सुमेध सध्या चांगलाच खूश आहे. कारण त्याला बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.            
व्हेंटिलेटर आणि मांजा या दोन सुपरहिट चित्रपटानंतर सुमेध मुद्गलकर पुन्हा एकदा चाहत्यांच्या बकेट लिस्ट मधील इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे. २०१७ मध्ये आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीमधून सुमेध नेहमीच चर्चेत होता. झी टॉकीज प्रस्तुत "महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?" आणि "रेडिओ सिटी सिने अवॉर्ड्स" या दोन्ही पुरस्कार सोहळ्यामध्ये सुमेधने वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये नामांकनं पटकावली. २०१७ नंतर २०१८ हे वर्षं देखील त्याच्यासाठी खूपच खास आहे. प्रत्येक चित्रपटात एखादी वेगळी भूमिका साकारण्याचा प्रयत्न सुमेध करत असतो. त्याच्या याच अनोख्या अंदाजामुळे हा नवोदित आणि तरुण अभिनेता नेहमीच चर्चेत असतो.
माधुरी दीक्षितच्या बकेट लिस्ट या पहिल्या मराठी चित्रपटामध्ये सुमेध झळकणार असून माधुरीसोबत काम करायला मिळत असल्याने तो प्रचंड खूश आहे. काही महिनांपूर्वी सुमेधने माधुरी दीक्षित सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. यावरूनच सुमेध माधुरीच्या चित्रपटाचा भाग असल्याचे त्याच्या चाहत्यांना कळले होते. पण सुमेध या चित्रपटात कोणत्या भूमिकेमध्ये असणार याविषयी त्याने मौन राखणेच पसंत केले आहे. 
मांजा चित्रपटातून सुमेधने मराठीसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर त्याने व्हेंटिलेटर या चित्रपटात काम केले. मांजा या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण या चित्रपटात काम करायचे की नाही याविषयी तो संभ्रमात होता. कारण त्याचा एक खूप चांगला प्रोजेक्ट काहीच दिवसांत सुरू होणार होता आणि त्याच वेळी त्याला मांजा या चित्रपटाविषयी सांगण्यात आले होते. या चित्रपटाची पटकथा ऐकल्यावर तो या चित्रपटाच्या कथेच्या प्रेमात पडला होता. पण वेळ नसल्याने त्याने या चित्रपटासाठी नकार देण्याचा विचार केला होता. मात्र अचानक त्याचे ते प्रोजेक्ट रद्द झाले आणि तो मांजा या चित्रपटाचा भाग बनला. 

Also Read : बकेट लिस्टच्या गाण्याच्या शूटिंगसाठी माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन मलेशियात
Web Title: Sumedh Mudgalkar will be seen in Madhukari's bucket list
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.