'बाॅईज' पेक्षा 'बाॅईज-2' सिनेमा सरस - सुमंत शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 03:57 PM2018-10-01T15:57:38+5:302018-10-01T16:00:34+5:30

शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या बॉईजची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले असून, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची धम्माल मस्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार आहे.

Sumant Shinde Interview On Boys 2 Marathi Movie | 'बाॅईज' पेक्षा 'बाॅईज-2' सिनेमा सरस - सुमंत शिंदे

'बाॅईज' पेक्षा 'बाॅईज-2' सिनेमा सरस - सुमंत शिंदे

googlenewsNext

'बॉईज'नंतर 'बॉईज २' येतोय तर काय सांगशील याबद्दल आणि बॉईज २ हा कसा  वेगळा आहे बॉईज पेक्षा ?

सगळ्यात आधी सांगायचं झालं तर मला आणि प्रतीकला विशाल दादानी सांगितलं होत कि तुम्ही बॉईज २ मध्ये नाही आहात. तो नेहमी आम्हाला बोलायचा कि, मी तुम्हाला खूप मिस करेन, तेव्हा आमच्या दोघांना असा प्रश्न पडायचा की पुढच्या सिनेमात आम्ही नाहीये? का विशाल दादा सिनेमा करत नाहीये?. पण नंतर त्यांनी आम्हाला फोटोशूटसाठी बोलावलं, तेव्हा आम्हला कळलं कि आम्ही फायनली असून फक्त यावेळी आमच्यासोबत नवीन स्टारकास्ट असणार आहेत. बॉईज २ बद्दल बोलायचं झालं तर, मी असं सांगू शकतो बॉईज मध्ये तुम्हाला प्रतीक आणि पार्थ या दोघांची केमिस्ट्री आणि त्याच्या विरुद्ध असणारा मी असं चित्र दिसलं होतं. पण बॉईज २ मध्ये असं काही नाहीये. यात आम्ही सगळे सोबत आहोत. यात आम्ही शाळेतून कॉलेजमध्ये गेलो आहोत. तिकडे चालणारी धमाल मस्ती आणि कॉलेजच विश्व या सिक्वेलमध्ये दिसणार  आहे. 

अभ्यास आणि अभिनय या दोन बाजू तू कशा संभाळतोस ?

माझ्यासाठी अभिनय हाच अभ्यास आहे. कारण त्याचीच मला खूप आवड आहे, अभिनयामध्ये मला भरपूर शिकायला मिळत आणि त्यासाठी केलेला अभ्यास मला जवळचा आहे. तस बघायला गेलं तर, मी  लंडनमध्ये बिझनेस मॅनेजमेन्ट शिकत आहे. आता बॉईज २ च्या शूटिंगसाठी मी इथे आलो होतो आता, बॉईज २ प्रदर्शित झाल्यानंतर लंडनला जाऊन माझा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे. 

कबीर साकारताना तू कशापद्धतीने तयारी केली होतीस ? आणि शूटिंग दरम्यानचा असा कोणता किस्सा तुझ्या लक्षात आहे ?

तसं बघायला गेलं तर कबीर साकारणं मला खूप अवघड होत. कारण मी मुळातच मज्जा मस्ती करणारा मुलगा आहे. आणि बॉईजमध्ये कबीरची व्यक्तीरेखा माझ्या मूळ स्वभावाच्या अगदी वेगळी आहे.  म्हणजे त्याच्यासोबत कोणी मज्जा मस्ती केलेली त्याला आवडायची नाही, त्याला एकटच राहायला आवडायचं. म्हणून मला बॉईजमध्ये कबीर साकारणं खूप कठीण गेलं होत. बॉईज २ मध्ये माझा एक सीन आहे ज्यामध्ये, देविका मॅडम समोरून येत असतात आणि , मी माझी खांद्यावरची वरची बॅग शीफ्ट करतो, तो सीन मला विशाल दादा करून दाखवत होता तेव्हा खरंच आम्हाला सगळ्यांना खूप हसायला येत होत, कारण बघताना तो सीन खूप मजेशीर असा वाटतो पण शूट करत असताना, खरंच माझी खूप धांदल उडाली होती. 

खऱ्या आयुष्यात सुमंत कसा आहे ?

खऱ्या आयुष्यात सुमंत मज्जा मस्ती करणारा मुलगा आहे. ज्याप्रमाणे तो तुम्हाला बॉईजमध्ये दिसला त्याच्या अगदी विरुद्ध आहे, कारण मी खूप मोकळ्या मनाचा आहे. आणि कबीर तसा बिलकुल नाही आहे. पण यामध्ये सुद्धा फरक आहे. मी जेव्हा लंडनमध्ये असतो तेव्हा, खूप मोकळा असतो मला जे करायचं आहे ते मी करू शकतो किंबहुना असं बोलू शकतो कि मी लंडनमध्ये स्वतःला खूप चांगला वेळ देऊ शकतो, जे भारतमध्ये राहून मला करता येत नाही.

तुझा ड्रीमरोल कोणता आहे ? हिंदी आणि मराठी चित्रपटश्रुष्टीमध्ये कोणासोबत काम करायला आवडेल ?

मला बजरंगी भाईजान या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने भारत आणि पाकिस्तान या दोन प्रांतामधल्या विभागलेल्या अंतरावर भाष्य केलं आहे. तसा रोल करायला आवडेल कारण, लंडनमध्ये मी नाटक करतो, तर तिकडे मला पाहिजे तसे रोल करायला मिळतात पण, ज्याप्रमाणे प्रत्येक कलाकाराचा एक ड्रीम रोल असतो, तसा माझा सुद्धा आहे. बॉलीवूड मध्ये मला आलिया भट सोबत काम करायला आवडेल कारण, खूप कमी वेळात तिने स्वतःला सिद्ध केलं आहे. आणि मराठी चित्रपटश्रुष्टी मध्ये मला जितेंद्र जोशी सोबत काम करायला आवडेल

Web Title: Sumant Shinde Interview On Boys 2 Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.