Subodh to work with a favorite Amrita | सुबोधला आवडते अमृतासोबत काम करायला

 
                चित्रपटामध्ये आपला सहकलाकार कोण आहे यावर त्या चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री यांची केमिस्ट्री अवलंबून असते. कलाकारांना एकमेकांसोबत काम करताना कम्फर्टेबल वाटले तर त्यांच्यातील अभिनय बहरायलाही वेळ लागत नाही. आता हेच पाहा ना सुबोध भावेला अमृता सुभाष सोबत काम करायला फार आवडते. हे आम्ही सांगत नाही तर सुबोध स्वत:च असे म्हणत आहे. नूकतेच सुबोधने सोशल साईट्सवर अमृता सोबतचा एक फोटो अपलोड केला आहे. आणि तो म्हणतोय, माझी प्रिय मैत्रिण अमृतासोबत मला स्टेज शेअर करायला आवडते. तिच्यासोबत काम करतानाचा अनूभव हा नेहमीच शिकण्यासारखा असतो. सुबोधने या दोघांचा एक झक्कास सेल्फी देखील टष्ट्वीटरवर अपलोड केला आहे. अमृता सुभाष आणि सुबोध भावे आपल्याला लवकरच गोविंद निहलानींच्या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात आपल्याला ही जोडी कोणत्या रूपात दिसणार हे मात्र अजुनतरी गुलदस्त्यात आहे. परंतू सुबोधला त्याच्या लाडक्या कलाकारासोबत पुन्हा एकदा काम करता येणार असल्याने तो मात्र खुष आहे

       

Web Title: Subodh to work with a favorite Amrita
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.