Subodh Bhave-Shruti Marathe's Next Is A Wedding Drama | चक्क 'शुभ लग्न सावधान' चित्रपटाची छापण्यात आली लग्नपत्रिका !
चक्क 'शुभ लग्न सावधान' चित्रपटाची छापण्यात आली लग्नपत्रिका !

सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच ‘शुभ लग्न सावधान’ या मराठी चित्रपटाची आकर्षक लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे.या चित्रपटातून डेस्टिनेशन वेडिंग, लग्न सोहळ्यातील परंपरा आणि लग्नसंस्था हे रसिकांना अनुभवता येणार आहे. मराठीतील आघाडीचे कलाकार सुबोध भावे, श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये हे या लग्नपत्रिकेत शुभेच्छुक दिसत असून ; ज्येष्ठ कलाकार किशोर प्रधान हे वधु-वरांना आशीर्वाद देत आहेत.  मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारा प्रतीक देशमुख व चुलबुली रेवती लिमये ही नवी जोडी प्रेक्षकांना सिनेमागृहात यायचे लाडिक आग्रहाचे आमंत्रण करताना या पत्रिकेत दिसत आहे.यामुळे, या सर्व लोकप्रिय कलाकारांच्या चाहत्यांना उत्कंठापूर्ण प्रश्न पडला आहे की, 'शुभ लग्न सावधान’ या सिनेमात कोणाचे शुभ लग्न पाहवयास मिळणार आहे? त्यांची ही उत्सुकता त्यांना सिनेमागृहात घेवून येणार हे नक्की.१२ ऑक्टोबर, २०१८ या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत असणाऱ्या 'शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाची निर्मिती पल्लवी विनय जोशी यांनी केली असून ; संवाद लेखन व दिग्दर्शन या दुहेरी भुमिकेत समीर रमेश सुर्वे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. लग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत मराठी सिनेमात रसिकांनी अनुभवली नव्हती. मात्र आता लवकरच मराठी सिनेमात रसिकांना 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' अशा सिनेमांसारखी कथा पाहायला मिळणार आहे. 

'बंध नायलॉन'चे या मराठी सिनेमानंतर अभिनेता सुबोध भावे आणि श्रुती मराठी या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी ही जोडी रसिकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं शुटिंग दुबई आणि इगतपुरीमध्ये झालं आहे. लग्नाच्या निमित्ताने कुटुंबीय,नातेवाईक, मित्रपरिवार एकत्र येतात. त्यानंतर कशी धम्माल,मजामस्ती होते, नात्यांचे बंध कसे उलगडतात हे या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. 

 


Web Title: Subodh Bhave-Shruti Marathe's Next Is A Wedding Drama
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.