'Stand-up comedy' show at this place! | या ठिकाणी रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो!

यूट्यूबसारख्या माध्यमामुळे अनेक हरहुन्नरी कलावंत पुढे आले आहेत.त्यातील ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ क्षेत्रातील कलाकारांनाही मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्धी मिळतेय. यूटय़ूबचा बोलबाला वाढला तरीही लाइव्ह शोची गंमत कमी झालेली नाही.हेच ओळखून ‘न्यू नेस्ट’ या संस्थेने विनोदाची फटकेबाजी करणारा ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो रसिकांसाठी आयोजित केला आहे.‘भारतीय डिजिटल पार्टी’ म्हणजे ‘भाडिपा’ या मराठमोळ्या ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ चॅनलने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.या ‘भाडिपा’ चा ‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ हा धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो शुक्रवार २७ एप्रिलला ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे रात्रौ ८.३० वा रंगणार आहे. ज्योती सावंत आणि स्टीफन कैराना यांनी गुणी कलावंतांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने ‘न्यू नेस्ट’ या संस्थेची स्थापना केलीय.सोशल मीडियावर लोकप्रिय असणारे सारंग साठे, चेतन मुळ्ये, मंदार भिडे, आणि ओमकार रेगे हे चार विनोदवीर या शोचे सादरीकरण करणार आहेत. प्रत्येक शहराची तसेच तिथल्या माणसांची एक खासियत असते. हीच खासियत विनोदी ढंगात अनुभवण्याची मजा या शो मधून प्रेक्षकांना मिळणार आहे.या संकल्पनेबद्दल बोलताना ज्योती सावंत आणि स्टीफन कैराना सांगतात की,सोशल मीडियावरील या विनोदवीरांना घेवून अशा प्रकारचा लाइव्ह शो करण्याची कल्पना वेगळी असली तरी प्रेक्षक या ‘शो’ चे नक्की स्वागत करतील असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.

अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटांसाठी,मालिकांसाठी नेहमीच त्यांच्या लूकवर मेहनत घेत असतात.आपल्या आगामी चित्रपटात आपण वेगळे दिसावे यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो.भाडिपामुळे प्रसिद्धीझोतात आलेला सारंग साठ्ये आता प्रेक्षकांना त्याच्या आगामी चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.सारंगने पुष्कर श्रोती दिग्दर्शित उबंटू या चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता या चित्रपटानंतर सारंग एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे.या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात सांरगचा एक वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटातील सारंगची भूमिका त्याच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी असणार आहे. आजवर सगळ्याच चित्रपटात, मालिकांमध्ये आपल्याला सारंगला दाढीमध्ये पाहायला मिळाले होते. पण त्याने पहिल्यांदाच एखाद्या भूमिकेसाठी त्याची दाढी काढली आहे. त्याने तब्बल बारा वर्षांनंतर त्याची दाढी काढली असल्याने एक वेगळाच सारंग सगळ्यांना पाहायला मिळतोय.सारंग हायजॅक या हिंदी चित्रपटात काम करणार आहे. हा एक विनोदी चित्रपट असून या चित्रपटात त्याची मुख्य भूमिका असणार आहे. सारंगने आजवर लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. पण तो कधीच कोणत्या विनोदी भूमिकेत झळकला नव्हता. पण आता सांरग प्रेक्षकांना एका विनोदी भूमिकेत दिसणार असून त्यासाठी तो चांगलीच मेहनत घेत आहे. 
Web Title: 'Stand-up comedy' show at this place!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.