स्पृहा जोशीचा नवरा वरद लघाटेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 04:14 PM2018-09-17T16:14:39+5:302018-09-17T16:17:48+5:30

अभिनेत्री स्पृहा जोशीचा आगामी चित्रपट 'होम स्वीट होम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून स्पृहाचा नवरा वरद लघाटे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे.

Sprha Joshi's husband Varad Lagaat's debut film | स्पृहा जोशीचा नवरा वरद लघाटेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण

स्पृहा जोशीचा नवरा वरद लघाटेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण

googlenewsNext
ठळक मुद्दे 'होम स्वीट होम' चित्रपटातून वरदची रुपेरी पडद्यावर एन्ट्री 'इकडून तिकडे' या गाण्यात दिसणार वरद

अभिनेत्री स्पृहा जोशीचा आगामी चित्रपट 'होम स्वीट होम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून स्पृहाचा नवरा वरद लघाटे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. तो या सिनेमातील 'इकडून तिकडे' या गाण्यात दिसणार आहे. हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

'इकडून तिकडे' या गाण्याविषयी स्पृहा म्हणाली की, "माझ्यावर चित्रीत झालेले हे गाणे, अजय गोगवले यांनी गायले आहे.  अजय-अतुल ह्यांच्या संगीताची मी चाहती आहे. तसेच अजय गोगावलेंचा स्वरसाज असलेेले एखादे गाणे आपल्या सिनेमात असावे, अशी माझी इच्छा बऱ्याच कालावधीपासून होती. ही इच्छा 'इकडून तिकडे' गाण्यामूळे पूर्ण झाली आहे. हे गाणे माझ्या हृदया जवळचे असण्याचे दूसरे कारण म्हणजे यात वरदचा असलेला गेस्ट अपिअरन्स. जो योगायोगाने घडला आहे."

स्पृहा आपल्या पती वरदच्या पदार्पणाविषयी सांगते, "वरद नेहमी मला आणि माझ्या फिल्म मेकर्सना मस्करीत सांगतो की मला एक गेस्ट अपिअरन्स करायचा आहे. 'इकडून तिकडे'च्या चित्रीकरणावेळी वरद मला भेटायला सेटवर आला होता. हृषिकेशने वरदला एक छोटासा अपिअरन्स करशील का, अशी विनंती केली आणि वरदचा डेब्यू झाला."
स्पृहा पुढे म्हणाली, "२ स्टेट्स सिनेमाच्या एका सिक्वेन्सचे शूटिंग वरदच्या ऑफिसमध्ये झाले होते. त्यावेळी तो एका सिक्वेन्समध्ये पाठमोरा उभा होता. म्हणूनच वरद नेहमी मस्करीत म्हणतो की मी जो चित्रपट करतो तो २०० करोडचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करतो. त्यामूळे आता तूही ह्या सिनेमाने २०० करोड क्लबचा हिस्सा होणार."

Web Title: Sprha Joshi's husband Varad Lagaat's debut film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.