South superstar Nagarjuna, even Jhang Zing Zintat Mohini, said Bollywood and Hollywood can compete with Marathi cinema | साऊथचा सुपरस्टार नागार्जुनवरही झिंग झिंग झिंगाटची मोहिनी,म्हणाला बॉलीवुड आणि हॉलीवुडलाही टक्कर देऊ शकतात मराठी सिनेमा

साऊथच्या कलाकारांची बातच न्यारी असते.विशेषतः तिथल्या सुपरस्टार्सची.त्यांच्या अभिनयावर रसिक असे काही फिदा असतात की ते लाडक्या कलाकाराची देवाप्रमाणे पूजा करतात.इतके मोठे सुपरस्टार झाल्यानंतरही त्यांचे पाय कायमच जमिनीवर असतात.आपल्या भाषेतील सिनेमांसह इतर भाषांमधील सिनेमा आणि कला यावर हे सुपरस्टार तितकेच प्रेम करतात. या गोष्टीचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे साऊथचा सुपरस्टार नागार्जुन.चांगली कला मग ती कोणत्याही भाषेतील का असेना त्याचं कौतुक केलंच पाहिजे हे त्यानं दाखवून दिले आहे.नागार्जुनने मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या 'सैराट' सिनेमाचं तोंडभरुन कौतुक केलंय.निमित्त होते छोट्या पडद्यावरील कलाकारांच्या भेटीचे.अभिनेता सुयश टिळकसह अन्य कलाकारांनी नागार्जुन यांची भेट घेत खास मराठीत संवादही साधला.यावेळी नागार्जुन सैराटमय झाल्याचं पाहायला मिळालं. सैराट सिनेमा ४ ते ५ वेळा पाहिल्याचे नागार्जुनने सांगितले आहे.मित्रांकडून सैराट या सिनेमाबद्दल ऐकले होते.मात्र पाहिल्यानंतर तो खूपच भावला असं त्याने म्हटलंय.हा असा एकमेव प्रादेशिक सिनेमा आहे ज्याने सर्व बॉलिवूड सिनेमांनाही चांगलीच टक्कर दिल्याचे गौरवोद्गारही त्याने काढले.मराठी सिनेमा आणि प्रादेशिक सिनेमातच बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांना टक्कर देण्याची ताकद असल्याचे त्याने सांगितले.सैराट सिनेमाच्या कथेसह त्याला सिनेमाचं संगीतही भावलं.यातूनच नागार्जुन या सुपरस्टारचं मोठेपण दिसून येतंय.शिवाय यानिमित्ताने 'सैराट'ची जादू २ वर्षांनंतरही कायमच असल्याचे स्पष्ट झालंय.सैराट सिनेमाने ख-या अर्थाने मराठी सिनेमांची ताकद आणि उंची वाढवलीय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Web Title: South superstar Nagarjuna, even Jhang Zing Zintat Mohini, said Bollywood and Hollywood can compete with Marathi cinema
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.