South Korean actress Neha debut in Marathi film 'Shikari' | शिकारी या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्री नेहा मराठी चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण

सध्या सोशल मीडियावर शिकारी या चित्रपटाच्या पोस्टरची चांगलीच चर्चा आहे. मराठी चित्रपटसृष्टीत खूपच कमी वेळा आपल्याला बोल्ड पोस्टर पाहायला मिळतात. या चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर या पोस्टरमध्ये झळकणारी अभिनेत्री कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. या पोस्टरमध्ये झळकलेली सुंदर, बिनधास्त आणि सेक्सी अभिनेत्री ही नेहा असून शिकारी हा तिचा पहिला मराठी चित्रपट आहे. नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांना खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. 
शिकारी हा चित्रपट विजू मानेने दिग्दर्शित केला असून या चित्रपटाची निर्मिती विजय पाटील यांनी केली आहे आणि तो प्रस्तुत करत आहेत दिग्दर्शक महेश मांजरेकर.
शिकारी या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून हा टीझर प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. सोशल मीडियावर या टीझरची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील नेहाची अदा अगदी घायाळ करून टाकणारी आहे. हा एक बोल्ड चित्रपट असल्याने मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याविषयी नेहा सांगते, "मला शिकारी या चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली. त्यामुळेच मी या चित्रपटात काम करण्याचे ठरवले. लोकांना या चित्रपटातील माझा लूक आवडेल यात काहीच शंका नाही. पण त्याचसोबत या चित्रपटाची कथा आणि सादरीकरण देखील प्रेक्षकांना भावेल अशी मला खात्री आहे. मी या चित्रपटात अनेक बोल्ड सीन दिले आहेत. पण बोल्ड सीन ही या चित्रपटाच्या पटकथेची गरज होती. भविष्यात देखील पटकथेची गरज असल्यास आणि मला ती गोष्ट पटल्यास मी बोल्ड सीन नक्कीच देईन."
मराठीत बोल्ड सीन्स देणाऱ्या अभिनेत्रींवर अनेकवेळा टीका केली जाते. पण आपला प्रेक्षक वर्ग आज जागतिक सिनेमा देखील तितकाच आवडीने पाहात आहे. त्यामुळे नेहाच्या या चित्रपटातील भूमिकेचे देखील प्रेक्षक कौतुक करतील अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. 

shikari marathi movie

Web Title: South Korean actress Neha debut in Marathi film 'Shikari'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.