Soon Chougule's new movie | समीर चौगुले यांचा लवकरच नवा सिनेमा

कुणी निंदा,कुणी वंदा हसवणं हाच आमचा धंदा म्हणत कॉमेडी कलाकार रसिकांचं मनोरंजन करत असतात.आपला हजरजबाबी अभिनय आणि कॉमेडीमुळे रसिकांना हसून हसून लोटपोट करण्याचे काम कॉमेडी कलाकार करत असतात.अशाच कॉमेडी कलाकारांमध्ये नाव घ्यावे लागेल ते अभिनेता समीर चौगुले यांचं.छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहे.आता लवकरच एका नव्या सिनेमातून समीर चौगुले रसिकांच्या भेटीला येणार आहेत.ही गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर केली आहे.मात्र सिनेमाचं नाव, कलाकार,सिनेमाचा विषय, कथा याबाबत कोणतीही माहिती समीर चौगुले यांनी दिलेली नाही.मात्र आजवरील समीर चौगुले यांचा अभिनय प्रवास पाहता हा सिनेमा नक्कीच रसिकांचं धम्माल मनोरंजन करणारा असेल यांत शंका नाही.समीर चौगुले यांनी नव्या सिनेमाची बातमी रसिकांसह शेअर करताच सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरु झाला आहे. फॅन्स आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या या आगामी सिनेमासाठी चौगुले यांना शुभेच्या दिल्या आहेत.Web Title: Soon Chougule's new movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.