The song 'What's Up's Wedding' has gone 'where was gone ...', the song will soon be an audience meeting | ‘What’s Up लग्न’ मधील ​‘कुठे हरवून गेले...’ हे गाणे लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मनाला स्पर्शणारे बोल.. कर्णमधुर संगीत.. आणि मंत्रमुग्ध करणारा तरल आवाज हे प्रत्येक यशस्वी चित्रपटाचे  गमक मानले जाते. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्यातील गाणी जेव्हा रसिकांच्या ओठी रुळतात, तेव्हा त्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच शिगेला पोहचते. सध्या अशीच उत्सुकता मराठी चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतेय, ती म्हणजे ‘What’s Up लग्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने. ‘तू जराशी’ या गाण्याच्या लोकप्रियतेनंतर फिनक्राफ्ट मीडिया आणि व्हिडीओ पॅलेस आणखी एक सुमधुर गाणे प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहे.
क्षितीज पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘कुठे हरवून गेले..’ या हृदयस्पर्शी गीताला केतकी माटेगावकरच्या सुरेल आवाजाची साथ लाभली आहे तर ट्रॉय-आरिफ यांनी आपल्या जादुई संगीताने या गाण्याला चारचाँद लावलेत असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे या गाण्याच्या प्रसिद्धीसाठी एक नवा प्रमोशनल फंडा वापरला गेलाय.
‘कुठे हरवून गेले’ या गाण्याची उत्सुकता ताणून ठेवत निर्माते-दिग्दर्शकांनी या गाण्याचा चित्रपटातील व्हिडियो प्रसिद्ध न करता त्यासाठी एक खास व्हिडियो अल्बम बनवला आहे. ‘डान्स प्लस’ या गाजलेल्या रिअॅलिटी शोमधील पल्लवी आणि ऋषभ ही जोडी अल्बमसाठी निवडली गेली. फुलवा खामकर यांच्या नृत्यदिग्दर्शनखाली या गाण्यावर सेन्शुअस कंटेम्परी डान्स स्टाईल कोरिओग्राफ केली असून या गाण्याची एक छोटीशी झलक सध्या तुम्ही व्हिडियो पॅलेसच्या युट्यूब चॅनेलवर पाहू शकता.
‘कुठे हरवून गेले..’ हे संपूर्ण गाणं पाहण्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट पहावी लागणार असून म्युझिक चॅनेल्स, युट्यूब अशा विविध प्लॅटफॉम्सवर एकाचवेळी म्हणजेच ११ जानेवारीपासून हे गाणे आपल्याला पाहाता-ऐकता येईल.
फिनक्राफ्ट मीडिया निर्मित, जाई जोशी आणि व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत ‘What’s Up लग्न’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरेची ही लव्हेबल केमिस्ट्री लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत पाहायला मिळणार आहे. त्याआधी ‘What’s Up लग्न’ चित्रपटातील गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
लग्नानंतर प्रार्थनाचे होस्टेल डेज आणि ‘What’s Up लग्न’ असे दोन चित्रपट तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

Also Read : प्रार्थना बेहरे न्यूझिलंडमध्ये करतेय वाढदिवसाचे सेलिब्रेशन
Web Title: The song 'What's Up's Wedding' has gone 'where was gone ...', the song will soon be an audience meeting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.