'This' song expresses regret through Facebook | 'या' गायिकेने फेसबुकच्या माध्यमातून ही खंत केली व्यक्त

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. आपल्याला आवडलेल्या न आवडलेल्या प्रत्येक गोष्टी सगळेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होता दिसतात.समाजात होत असलेल्या काही खटकत असलेल्या गोष्टीवर  आपल्या भावना पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या  जातात.एरव्ही उघडपणे कोणत्याच गोष्टी बोलायला थोडा विचार केले जायचे मात्र आता सोशल मीडियामुळे कोणतीही गोष्ट मांडायला कोणीही कचरत नाही.असाच काहीसा किस्सा गायिका कविता रामनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.  

ग्लॅमरच्या झगमगत्या दुनियात प्रत्येकजण आपलं नाव वेगळ्या उंचीवर पाहण्याचं स्वप्न पाहत असतो.मराठी असो वा हिंदी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिटीशन वाढलं आहे.या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी कलाकार चिकाटीने काम करत असतात अशातच एखाद्या कामाचं श्रेय न मिळाल्यानं कोणत्याही कलाकाराला वाईट वाटण सहाजिकचं आहे. आणखी एक किस्सा आपल्या समोर सोशल मिडीयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आला आहे. हे नाव आहे कविता राम या गायिकेचं. कविता राम यांनी फेसबुकच्या माध्यमाने आपली खंत व्यक्त केली आहे. कविता यांनी "ये रिश्ता क्या कहलाता है", "गोदभराई", "मेरे  घर आयी  नन्हीं परी", "कैरी", "साथ निभाना साथिया", या मालिकांसाठी तर "या टोपीखाली दडलंय काय", "लाज राखते वंशाची", "दुर्गा म्हणत्यात मला", "शिनमा", "थँक यू विठठला", "हक्क" "लादेन आला रे" यांसारख्या मराठी तर "गब्बर इज बॅक", "सिंग इज किंग" या हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत.गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या "नगरसेवक" हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातील "हळद लागली" या गाण्यासाठी कविता यांनी पार्श्वगायनं केलं होतं पण अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे या गाण्याला सिनेमाच्या निर्मात्यांनी,म्युझिक कंपनी आणि म्युझिक डायरेक्टर यांनी गाण्याला कविता यांच्या नावाचे श्रेय दिले नाही.तसेच कुठेही कविता यांच्या नावाचा उल्लेख नसल्यानं कविता राम यांना ही बाब नाईलाजाने फेसबुकच्या माध्यमाने सर्वांसमोर मांडावी लागली.

Web Title: 'This' song expresses regret through Facebook
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.