Sonali on the set of one-way ticket ... | वन वे तिकीटच्या सेटवर सोनाली...


             सोनाली कुलकर्णी नूकतीच वन वे तिकीटच्या सेटवर दिसली. आता सोनाली या चित्रपटाच्या सेटवर काय करते, तीचा या सिनेमात रोल आहे का, की तीचा एखादा गेस्ट अ‍ॅपिअरन्स आहे असे अनेक प्रश्न सोनालीच्या चाहत्यांना नक्कच पडले असतील. तर सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या दोन मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्री एका सिनेमाच्या शूटनिमित्ताने आमने सामने आल्या. झालं असं की,अमृता खानविलकरच्या 'आगामी वन वे तिकीट' या सिनेमाचं शूटिंग क्रुझवर तसेच इटली, स्पेन आणि फ्रान्स या ठिकाणीही चित्रित करण्यात आलं आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे या सिनेमाच्या एका सीनचं चित्रीकरण चालू होतं. नेमकं त्याचवेळी कॅमे-याच्या फ्रेममध्ये एक ओळखीचा चेहरा दिसू लागला. हा चेहरा दुसरा तिसरा कोणाचा नसून सोनाली कुलकणीर्चा होता. सोनाली कुलकर्णी त्यावेळी स्पेनमध्ये स्वत:च्या कामानिमित्त आली होती. परक्या देशात आपली माणसं दिसल्यावर सोनालीला त्यांना भेटण्याचा मोह आवरला नाही. यावेळी सोनालीने सिनेमाच्या टीम सोबत भरपूर दंगा मस्ती केली. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. क्रुझवर चित्रित करण्यात आलेला हा पहिलाच मराठी सिनेमा असून अमोल शेटगे यांनी सिनेमाच दिग्दर्शन केलं आहे. सचित पाटील, गश्मीर महाजनी, शशांक केतकर आणि नेहा महाजन यांच्यादेखील प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. 
Web Title: Sonali on the set of one-way ticket ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.