Sonali Kulkarni says, I have a bicycle | सोनाली कुलकर्णी सांगतेय, मेरे पास सायकल है

सोनाली कुलकर्णीने आज केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनय, सौंदर्याने तिने रसिकांची मने जिंकली आहेत. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमाद्वारे देखील सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. मराठीत तिने अगं बाई अरेच्चा २, डॉ. प्रकाश बाबा आमटे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटासाठी तर तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे आज पाहिले जाते. मिशन काश्मीर, दिल चाहाता है या हिंदी चित्रपटातील तिच्या भूमिका तर प्रचंड गाजल्या होत्या. 
सोनाली ही तिच्या अभिययासोबतच तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. मराठीतील फिट अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. स्वतःला फिट राखण्यासाठी सोनाली प्रचंड मेहनत घेते. रसिकांना आपल्या सौंदर्याद्वारे घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी ही रिअल लाईफमध्ये उत्तम सायकलिस्ट आहे. वेळात वेळ काढून ती आपली सायकलिंगची आवड जोपासते. खार ते वर्सोवा किंवा वांद्रेपर्यंत ती अनेकवेळा सायकलिंग करते. आपल्या सायकलिंगबद्दल असणारी आवड सोनाली वेळोवेळी सोशल मीडियावरून तिच्या फॅन्सना फोटोंच्या माध्यमातून सांगत असते. तिने सोशल मीडियावर नुकताच तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती आपल्याला तिच्या सायकलसोबत दिसत आहे. या फोटोत ती खूपच छान आणि फिट दिसत आहे. या फोटसोबत तिने खूप छानशी कॅप्शन देखील लिहिली आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, लोक म्हणातात मेरे पास गाडी है, बंगला है... तुम्हारे पास क्या है तर माझे उत्तर आहे... माझ्याकडे माझी सायकल आहे. हा फोटो तिने एखाद्या समुद्रकिनारी काढला आहे असे फोटो पाहून आपल्या लक्षात येत आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून त्यांनी या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Also Read : ​दिल चाहता हैच्या वेळी आमिर खानने सोनाली कुलकर्णीला दिली होती वाढदिवसाला ही भेटवस्तू


Web Title: Sonali Kulkarni says, I have a bicycle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.