Sonali Kulkarni fell in love | ​सोनाली कुलकर्णी पडली प्रेमात

सोनाली कुलकर्णी पडली प्रेमात हे शीर्षक वाचून सोनाली कोणाच्या प्रेमात पडली असा तुम्हाला नेहमीच प्रश्न पडला असेल. पण हे खरे आहे की सोनाली कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. ती दुसऱ्या कोणाच्या नव्हे तर स्वतःच्या प्रेमात पडली आहे. 
सोनाली कुलकर्णीने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीत तिने अगं बाई अरेच्चा, डॉ. प्रकाश बाबा आमटे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटासाठी तर तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे आज पाहिले जाते. मिशन काश्मीर, दिल चाहाता है या हिंदी चित्रपटातील तिच्या भूमिका तर प्रचंड गाजल्या होत्या. आज मराठी, हिंदी इंडस्ट्रीत तिने चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे.
सोनाली तिच्या फॅशन सेन्सबाबत नेहमीच सतर्क असते. सोनाली आपल्याला कधी वेस्टर्न तर कधी भारतीय वेशभूषेत पाहायला मिळते. पण प्रत्येक ड्रेसमध्ये आपण अधिकाधिक सुंदर दिसावे याची ती नेहमीच खबरदारी घेते. सोनाली खरे तर या दोन्ही वेशभूषांमध्ये तितकीच सुंदर दिसते. तिने नुकताच ट्विटर या सोशल नेटवर्किंगला तिचा एक फोटो पोस्ट केला असून या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. 
सोनालीने एक खूपच सुंदर साडी नेसली असून या साडीवर साजेशी अशी अॅक्सेसरीज घातली आहेत. ही साडी काळी असून त्याला लाल आणि सोनेरी काठ आहे आणि त्यामुळे या साडीसोबत तिने सोनेरी रंगाचे दागिने घालणे पसंत केले आहे. हे दागिने तिच्यावर चांगलेच उठून दिसत आहेत. 
Web Title: Sonali Kulkarni fell in love
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.