Sonali Kulkarni - Did you suppress the portrait of Shah Rukh Khan by the King? Read detailed | सोनाली कुलकर्णी - बादशाह शाहरुख खानच्या भेटी मागे दडलंय काय?वाचा सविस्तर

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने हजारो मराठी फॅन्सच्या काळजाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे अप्सरा सोनाली कुलकर्णीसुद्धा खूप खुश आहे.याला एक खास कारणही आहे. यावेळी ती तिच्या सिनेमामुळे आनंदात नाही तर एक वेगळ्या गोष्टीमुळे आनंदात असल्याचे दिसतंय.आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याचा आनंद काही औरच असतो. असाच आनंद या फोटोत सोनाली कुलकर्णीच्या चेह-यावर पाहायला मिळतोय.शाहरुखसोबत सोनालीचा हा फोटो पाहून शाहरूखच्या आगामी सिनेमात झळकणार की,काय असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. मात्र असे काही नसून सोनालीने काही दिवसांपूर्वीच ट्विटरच्या ऑफिसला भेट दिली.आणि याच बिल्डींगमध्ये अचानक शाहरुख आणि सोनालीची भेट झाली. किंग खान शाहरुख समोर म्हटल्यावर एक फोटो होणार नाही हे तर अशक्यच.तसेच सोनाली शाहरूखची फॅन आहे.शाहरूख आपले क्रश असल्याचेही तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये म्हटलंय.शाहरुखसह क्लिक केलेला फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करताच तिला खूप सा-या प्रतिक्रीया मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.सध्या शाहरुख भेटीमुळे सोनाली भलतीच खुश आहे.तिने तिच्या सोशल मीडियावर शाहरुखसोबतचा फोटो पोस्ट करुन ''फोटोंना कॅप्शनची गरज नसते... बस नाम ही काफी है...'', असे लिहिले आहे.सोबतच 'माय क्रश', 'जबरा फॅन', 'व्हेन सोनाली मेट एसआरके', 'फॅन मोमेंट' हे हॅशटॅगसुद्धा तिने दिले आहेत.सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह असते. तिच्याशी संबधित सगळ्या घडामोडी ती  सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्राम फेसबुक,ट्विटरवर  अपडेट करत असते.सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवादही साधत असते.त्यामुळे सोनालीच्या फॉलोअर्सची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शाहरुखसह भेटल्याचा आनंद तिने आपल्यापुरताच मर्यादित न ठेवता चाहत्यांसह आपला आनंद शेअर केला आहे. 
Web Title: Sonali Kulkarni - Did you suppress the portrait of Shah Rukh Khan by the King? Read detailed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.