सोनाली कुलकर्णी व सिद्धार्थ चांदेकरचे वेब सीरिजमध्ये पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 04:47 PM2019-04-09T16:47:05+5:302019-04-09T16:47:31+5:30

सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर कॅफे मराठी निर्मित आणि शेमारूमी प्रस्तुत ‘मनातल्या मनात’ या मराठी वेब सीरिजमधून डिजिटल विश्वात पदार्पण करत आहेत.

Sonali Kulkarni and Siddharth Chandekar's debut in the web series | सोनाली कुलकर्णी व सिद्धार्थ चांदेकरचे वेब सीरिजमध्ये पदार्पण

सोनाली कुलकर्णी व सिद्धार्थ चांदेकरचे वेब सीरिजमध्ये पदार्पण

googlenewsNext

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या वेगवेगळ्या रुपात मराठी प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे. आता हिच सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर, हे दोघेही कॅफेमराठी निर्मित आणि शेमारूमी प्रस्तुत ‘मनातल्या मनात’ या मराठी वेब सीरिजमधून डिजिटल विश्वात पदार्पण करत आहेत. शेमारूमी या मोबाईल अॅपवर आणि वोडाफोन प्लेवर ही वेब सीरिज पाहता येणार आहे. शिरीष लाटकर लिखित, संदीप मनोहर नवरे दिग्दर्शित ही वेबसिरीज तरुणांसाठी मनोरंजनाची खुसखुशीत मेजवानी ठरणार आहे.

सिनेमातून आपण नेहमीच या कलाकरांना भेटत असतो, परंतु आता सारे विश्व मोबाईलवर एकवटले असतांना त्यात हे मराठी कलाकार मागे कसे राहणार? ‘मनातल्या मनात’ ही हळूवार फुलत जाणारी रोमँटिक अशी गोष्ट आहे. लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी भेटणाऱ्या अभिषेक आणि शिवानीची ही गोष्ट सर्वसामान्य प्रेक्षकांना आपल्या आयुष्यात डोकायला लावणार आहे. मराठी कुटुंबात लग्नासाठी चार-चौघात भेटून एकमेकांना समजून घेण्याऐवजी दोघेही एकांतात भेटून ऐकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु गोष्ट एवढीच नाही. त्यांच्यासोबत या भेटीत अजुनही कुणीतरी आहे, ते कोण आहेत? का आहेत ? पुढे त्या दोघांचे काय होते ? यासाठी तुम्हाला ‘मनातल्या मनात’ वेबसीरिज पहावी लागेल.


या सिरीजचे क्रिएटर आणि कॅफे मराठीचे फाउंडर निखिल रायबोले म्हणाले की, कॅफे मराठी तर्फे आम्ही सतत प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करीत असतो. ह्या वेळी पहिल्यांदाच मराठी डिजिटलवर रोमँटिक आशयावर काहीतरी वेगळे असे बघायला मिळणार आहे. अरेंज मॅरेजच्या आधीच्या ५ भेटी, त्यामध्ये काय घडू शकते, कोणत्या विषयांवर चर्चा होऊ शकते असे बरेच काही बघायला मिळणार आहे. ही गोष्ट तुमच्या आमच्या सर्वांची आहे आणि अपेक्षा आहे की ही तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. 

सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघेही तेवढेच उत्सुक आहेत. कारण या दोघांची ही पहिलीच वेब सीरिज आहे. विषय आणि त्याचे सादरीकरण दोघेही आवडल्याने दोघांनी ही वेब सीरिज करण्यासाठी होकार दिला.

मराठी प्रेक्षकांना ही वेब सीरिज आवडेल असा आशावाद देखील दोघांनी व्यक्त केला.

Web Title: Sonali Kulkarni and Siddharth Chandekar's debut in the web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.