On social media, only and only talk about Mahesh Kale, because what is the reason? | सोशल मीडियावर फक्त आणि फक्त महेश काळेचीच चर्चा,जाणून घ्या काय आहे कारण?

'सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.कार्यक्रमातील स्पर्धकांच्या उत्तम गायकीमुळे या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.प्रेक्षकांची हीच पसंती लक्षात घेऊन आज कार्यक्रमातील परीक्षक महेश काळे यांनी कलर्स मराठी वाहिनीचे Facebook, Twitter & Instagram Page hack केले आहे.म्हणजे आज महेश काळे संपूर्ण दिवस या माध्यमांद्वारे त्यांच्या प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत, काही महत्वाच्या गोष्टी त्यांच्या सोबत शेआर करणार आहेत. कलर्स मराठीने हाती घेतलेल्या प्रसिद्धीच्या या आगळ्यावेगळ्या टेकनिकला सोशल मिडीयावर प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.महेश काळे हे पेजेस आज स्वत: सांभाळत असून त्यांनी आतापर्यंत त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी दिलेल्या अमुल्य गोष्टींमधून काही निवडक आणि स्पेशल गोष्टी कलर्स मराठीच्या फेसबुक पेज, ट्वीटर आणि Insta वर शेअर केल्या आहेत. तसेच सकाळी सूर नवा ध्यास नवाच्या सेटवर जाताना एक छानसा सेल्फी देखील आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी एक सोशल मेसेज देखील देला आहे – “Guys do not type or use your phone while driving. I have taken this picture when the car was stopped”.महेश काळे यांनी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना दिलेले काही स्केचेस,चित्र देखील यादरम्यान शेअर केली आहेत. 

कट्यारच्या यशानंतर गायक म्हणून महेशनं मराठी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्यामुळे विविध संगीत रिअॅलिटी शोमध्येही परीक्षकाच्या भूमिकेतही तो झळकला आहे. सध्या सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात महेश परीक्षकाची भूमिका बजावत आहे. महेशने नुकत्याच एका महोत्सवाला हजेरी लावली होती.तिथे त्याला खूप चांगला अनुभव आला असल्याचे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर या महोत्सवातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या त्याच्या व्हिडिओला २६ हजाराहून अधिक व्हयूज मिळाले आहेत.महेश काळे लवकरच रुपेरी पडद्यावर अभिनेता म्हणून झळकण्याची शक्यता आहे.कट्यारच्या यशानंतर गायक म्हणून महेशनं मराठी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्यामुळे विविध संगीत रिअॅलिटी शोमध्येही परीक्षकाच्या भूमिकेतही तो झळकला आहे. आता मराठी सिनेमात तो अभिनय करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एखादी चांगली स्क्रीप्ट मिळाल्यास सिनेमात काम करायला आवडेल असं सांगत खुद्द महेश काळेने याचे संकेत दिले आहेत. 

Web Title: On social media, only and only talk about Mahesh Kale, because what is the reason?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.