So, Swapnil Joshi, to learn to love selflessly, click to know | म्हणून निस्वार्थपणे प्रेम करायला शिका सांगतोय स्वप्निल जोशी,जाणून घेण्यासाठी क्लिक करा

स्वप्नीलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना त्याकाळी प्रचंड पसंतीस आली होती. पुढे ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्र मात स्वप्नीलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला. या कार्यक्रमातील त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले.मालिकानंतर मुंबई पुणे मुंबई, मंगलाष्टक वन्समोअर, प्यारवाली लव्हस्टोरी, मितवा, तु ही रे, दुनियादारी या चित्रपटांमधून प्रेमाची नवी भाषा सांगणारा आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम करायला लावणारा लव्हगुरु स्वप्नील जोशी या व्हॅलेनटाईन डे निमित्त प्रेमाची नवी परिभाषा सांगतो आहे.

व्हॅलेनटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस  फक्त प्रियकर आणि प्रेयसी पुरताच तो मर्यादित नसावा अस मला वाटत.सगळ्यात जास्त प्रेम जर आपल्यावर कोणी करत असेल तर ते आहे आपले कुटुंब.आपण सगळेच सगळ्यांसाठी वेळ काढतो पण प्रामाणिकपणे करत  जण आपल्या कुटुंबासाठी वेळ काढतात.आपल्या कामात आपण इतके व्यग्र होतो की आपण आपल्या कुटुंबाला गृहीत धरायला लागतो आणि म्हणूनच नात्यात दुरावा निर्माण होतो. कुटुंबासाठी काम करता करता त्यांनाच आपण वेळ देऊ शकत नाही. माझ्या मते वर्षातील ३६५ दिवस हे प्रेमाचे दिवस असतात. आपण सर्वांनी आपल्या जवळच्या व्यक्तींवर भरभरून प्रेम केले पाहिजे. पण कामाच्या व्यस्त शेड्यूल मध्ये आपल्याला त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. या व्हॅलेनटाईन डेच्या निमित्ताने आपल आपल्या जवळच्या व्यक्तींवर असलेल प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते व त्याचा पुरेपूर उपयोग आपण प्रत्येकाने करायलाच हवा.

प्रेमासारखी दुसरी सुंदर आणि निर्मळ अशी कुठलीच गोष्ट नाही म्हणूनच सांगतो दिल खोल के प्यार करो. जीवनाचा खरा अर्थ प्रेम मिळवण्यापेक्षा प्रेम देण्यात आहे. आपल्या जवळच प्रेम निस्वार्थपणे दुसऱ्याला द्यायला शिका. यातून खरा आनंद मिळतो. आपल्या जोडीदाराला समजून घेण फार महत्वाच असत.आणि हल्लीच्या प्रेमीयुगुलांना माझा अत्यंत महत्वाचा सल्ला “नात हे हळू हळू उलगडण्यातच त्याची खरी गम्मत आहे. 

Web Title: So, Swapnil Joshi, to learn to love selflessly, click to know
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.