So on February 23, the audience met the "Atrophy" audience | म्हणून २३ फेब्रुवारीला ‘अॅट्रॉसिटी’ प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपट माध्यमाने सामाजिक भान जपत आजवर अनेक चांगल्या कलाकृती दिल्या आहेत. आर पी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘अॅट्रॉसिटी’ या चित्रपटातही सामाजिक बांधिलकीची जाण असलेले कथानक सादर करण्यात आले आहे. डॅा. राजेंद्र पडोळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन दिपक कदम यांनी केले आहे.२३ फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.सरकार नेहमीच नवनवीन कायदे करत असतं, पण त्यापैकी बरेच कायदे ज्यांच्यासाठी बनवलेले असतात त्यांनाच ठाऊक नसतात.‘अॅट्रॅासिटी’ हा चित्रपट पाहिल्यावर त्याचा प्रत्यय नक्कीच येईल. समाजातील ज्या घटकांसाठी एखादा विशेष कायदा बनवला जातो त्या घटकांना त्याबाबत काहीच ठाऊक नसतं, पण याचा फायदा काही मूठभर लोक घेऊन स्वत:ची पोळी मात्र भाजून घेतात. ‘अॅट्रॅासिटी’ या कायद्याचा दुरुपयोग केला तर काय होऊ शकतं ते ‘अॅट्रॅासिटी’मध्ये दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाची मूळ संकल्पना निर्माते डॅा. राजेंद्र पडोळे यांची आहे. या चित्रपटाचं शीर्षक जरी ‘अॅट्रॅासिटी’ असं असलं तरी यात मनोरंजनाचा सर्व मसाला ठासून भरला आहे. यात एक सुरेख प्रेमकथाही आहे. त्याला सुमधूर संगीतरचनांची किनारही जोडण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट समाजातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करेल आणि आपलासा वाटेल अशी आशा निर्माता दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे.गीतकार अनंत जाधव, मंदार चोळकर, अखिल जोशी, विजय के. पाटील यांनी ‘अॅट्रॉसिटी’ मधील गीतं लिहिली असून, संगीतकार अमर-रामलक्ष्मण यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे.आनंदी जोशी,वैशाली सामंत,जान्हवी प्रभू-अरोरा,शशिकांत मुंबारे,नंदेश उमप,सौरभ पी.श्रीवास्तव या गायकांनी या गीतरचना गायल्या आहेत.अनिल सुतार आणि जास्मिन ओझा यांनी गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत.ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल या नव्या जोडीसह या चित्रपटात यतिन कार्येकर, विजय कदम, डॉ. निशिगंधा वाड, लेखा राणे, गणेश यादव, सुरेखा कुडची, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील,शैलेश धनावडे,निखिल चव्हाण या कलाकारांच्या भूमिका आहेत. कॅमेरामन राजेश राठोड यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून, मधू कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. कलाकारांच्या निवडीची जबाबदारी राजेंद्र सावंत यांनी पार पाडली आहे,तर संकलनाचं काम विनोद चौरसिया यांनी केलं आहे.बिरू श्रीवास्तव या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, विनोद बरई व राजेंद्र सावंत प्रोडक्शन कंट्रोलर आहेत.
Web Title: So on February 23, the audience met the "Atrophy" audience
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.