Sing tale of joy singing joy | ​आनंदी जोशीने गायले तमीळ गाणे

मराठी कलाकार मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणे बॉलिवूड, दाक्षिणात्य इंडस्ट्रीत देखील आपले नाव कमावत आहेत. आज अनेक मराठी कलाकार, गायकांनी आपल्या कलेने बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच अनेक मराठी गायक सध्या दक्षिणेत अनेक गाणी गात आहेत. सावनी रविंद्र, आनंदी जोशी यांनी दक्षिणेत गायलेली अनेक गाणी हिट झाली आहेत.
आनंदी जोशीने देवा तुझ्या गाभाऱ्याला, जल्लोष तालाचा, तुझ्या रूपाचे चांदणं, बावरी, किती सांगायचंय मला यांसारखी मराठी गाणी गायली आहेत. देवा तुझ्या गाभाऱ्याला हे गाणे तर रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होेते. तसेच लज्जतदार, तुझे माझे जमेना, लगोरी, जावई विकत घेणे आहे, तुझ्यात जीव रंगला अशा प्रसिद्ध मालिकांचे शीर्षकगीत देखील तिने गायले आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे शीर्षक गीत सध्या चांगलेच गाजत आहे. यासोबतच आनंदीच्या अनेक अल्बम मधील गाण्यांना प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली आहे. आनंदीने विविध माध्यमांमध्ये आजवर अनेक गाणी गायली आहेत. आज मराठी चित्रपटसृष्टीत तिने तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. तिची अनेक गाणी प्रचंड हिट आहेत. 
आनंदी जोशीने केवळ मराठीतच नव्हे दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील गाणी गायली आहेत. तसेच तेलुगू भाषेतही तिने गाणी गायली आहेत. ही तिची गाणी देखील लोकांना खूप आवडली आहेत.  दक्षिणेतील तमीळ भाषेत तिने आतापर्यंत दोन गाणी गायली असून ही दोन्ही गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. उरू पक्का कथाई या चित्रपटात आनंदी गाणे गाणार असून हे गाणे तिने काहीच दिवसांपूर्वी रेकॉर्ड केले आहे. या गाण्यात तिला सीन रोल्डन या गायकाने साथ दिली आहे तर गोविंद मेननने या गाण्याला संगीत दिले आहे. 
उरू पक्का कथाई या चित्रपटात कालिदास जयराम आणि मेघा आकाश यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. कालिदास हा दक्षिणेतील जयाराम या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
Web Title: Sing tale of joy singing joy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.