Signature debut film 'Dostagiri' debut in the film industry | संकेत पाठक ‘दोस्तीगिरी’तून करतोय चित्रपटसृष्टीत पदार्पण

स्टार प्रवाहवर प्रसारित झालेल्या ड्रिंमींग ट्वेंटिफोर सेवन निर्मित दुहेरी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता संकेत पाठक आता लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. संतोष वसंत पानकर निर्मित आणि विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमातून संकेत पाठक चित्रपटसृष्टीत आपला डेब्यू करत आहे. या चित्रपटाचे कथानक मैत्री भोवती गुंफण्यात आल्याचे समजतेय.

संकेत ह्याविषयी सांगतो, “ड्रिंमींग ट्वेंटिफोर सेवनच्या दुहेरी मालिकेमूळे मला खूप प्रसिध्दी मिळाली. आज मी महाराष्ट्रात कुठेही जातो, तर मला माझ्या नावाने नाही तर दुष्यंत अशी हाक मारतात. त्यामुळे मालिकेसाठी घेतलेली मेहनत आणि स्टार बनायचे माझे स्वप्न पूर्ण झाले.” “पण प्रत्येक कलाकाराला एकदा तरी रूपेरी पडद्यावर झळकावेसे वाटतेच. मलाही सिनेसृष्टीत पदार्पण करण्याची इच्छा होती. माझं हे स्वप्न आता दोस्तीगिरी सिनेमामुळे सत्यात उतरणार आहे. मनोज वाडकर ह्यांची कथा, पटकथा आणि संवांद असलेला हा सिनेमा जेव्हा माझ्याकडे आला, मी लगेच सिनेमा करायला होकार कळवला.”

संकेत सिनेमाविषयी सांगतो, “एक तर दुष्यंतच्या भूमिकेनंतर अशा पध्दतीचा रोल मिळाल्याने माझ्या अभिनयातली वैविध्यता रसिकांसमोर येणार होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजपर्यंत माझा अभिनय मालिकांमधून प्रेक्षकांना दिसलाय. पण आता मी ह्या सिनेमात डान्सिंग आणि फाइटिंगही करताना तुम्ही पाहाल. हा सिनेमा नावाप्रमाणेच मैत्रीवर भाष्य करणारा सिनेमा आहे. सिनेमात माझ्या जिवलग मित्रांच्या भूमिकेत अक्षय वाघमारे आणि विजय गिते तुम्हाला दिसतील.” दुहेरी या मालिकेत संकेत पाठकने साकारलेल्या दुष्यंत या भूमिकेची खूप चांगलीच चर्चा झाली. 

अरिहंत मुव्हीज क्रिएशन्स प्रस्तूत मोरया मुव्हीज क्रिएशन्स निर्मित दोस्तीगिरी चित्रपटाचे दिग्दर्शन विजय शिंदे ह्यांनी केले आहे. सिनेमा लवकरच सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. 
Web Title: Signature debut film 'Dostagiri' debut in the film industry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.