सिद्धार्थ चांदेकरने 'गुलाबजाम'च्या आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 03:12 PM2019-03-15T15:12:30+5:302019-03-15T15:12:54+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम बॉय म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा 'गुलाबजाम' चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष उलटले आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होती.

Siddhartha Chandekar gave the memories of 'Gulab jam' | सिद्धार्थ चांदेकरने 'गुलाबजाम'च्या आठवणींना दिला उजाळा

सिद्धार्थ चांदेकरने 'गुलाबजाम'च्या आठवणींना दिला उजाळा

googlenewsNext
ठळक मुद्दे'गुलाबजाम' चित्रपटाची कथा आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) आणि राधा (सोनाली कुलकर्णी) या दोन आपल्या विश्वात गुंतलेल्या दोन व्यक्तींभोवती फिरते

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम बॉय म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा 'गुलाबजाम' चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष उलटले आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होती. सिद्धार्थने नुकतेच सोशल मीडियावर गुलाबजाम चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनच्या दरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने त्याचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या हातात एक फाइल असून एकाग्रतेने काहीतरी ऐकताना दिसतो आहे. या फोटोसह त्याने म्हटले की, 'बरोबर दोन वर्षांपूर्वी पहिली टीम गुलाबजामची स्क्रीप्ट वाचत असताना. या गोष्टीमुळे सर्वकाही बदलले. या फोटोसाठी सोनाली कुलकर्णीचा मी आभारी आहे. '


'गुलाबजाम' चित्रपटाची कथा आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) आणि राधा (सोनाली कुलकर्णी) या दोन आपल्या विश्वात गुंतलेल्या दोन व्यक्तींभोवती फिरते. आदित्य हा लंडनला नोकरीला असतो, पण त्याची आवड हि स्वयपाक करण्यात असते. त्याला चांगला महाराष्ट्रीय स्वयंपाक शिकायचा असतो आणि त्यासाठी तो थेट पुणे गाठतो. इथे तो चांगला स्वयपाक शिकवणा-या व्यक्तीच्या शोधात असतो. ज्या मित्रांकडे तो रहायला आलेला आहे त्याच्यासाठी आलेला मेसचा डबा जेवायला घेतो. त्यातले जेवण त्याला खूप आवडते. पुढे त्याच डब्यात असलेले गुलाबजाम तो खातो आणि आणखीन भारावून जातो. ते चविष्ट जेवण बनवणाऱ्या बाईचा शोध तो घेतो. ते उत्तम जेवण बनवणारे हात राधाचे असतात. राधा आगरकर ही एकटी राहते. तिचा वेगळा भूतकाळ आहे. तिच्या वागण्याला तिचा भूतकाळ जबाबदार आहे आहे. ती आदित्यला स्वयपाक शिकवण्यास नकार देते, यावर आधारीत हा सिनेमा आहे.

Web Title: Siddhartha Chandekar gave the memories of 'Gulab jam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.