Siddharth Chandekar celebrates Valentine's Day with this Marathi actress | ​सिद्धार्थ चांदेकरने या मराठी अभिनेत्रीसोबत साजरा केला व्हॅलेंटाईन डे

सिद्धार्थ चांदेकरचा गुलाबजाम हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सिद्धार्थ करत आहे. सिद्धार्थचे फॅन्स देखील त्याच्या या चित्रपटाबाबात चांगलेच उत्सुक आहेत. सिद्धार्थ सध्या त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात प्रचंड व्यग्र असला तरी त्याने वेळात वेळ काढून व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला आहे. त्याने हा व्हॅलेंटाईन डे एका मराठी अभिनेत्रीसोबत साजरा केला आहे आणि तिच्यासोबतचा फोटोदेखील इन्स्टाग्राम वर शेअर केला आहे. ही अभिनेत्री मिताली मयेकर असून या फोटोत सिद्धार्थ आणि मिताली दोघेही खूप खूश दिसत आहेत. 
सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी मितालीसोबतचा एक डबस्मॅश व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत सिद्धार्थ मितालीला 'मी काही तुझा भाऊ नाही, मला भाऊ म्हणू नको' असे म्हणत होता तर दुसरीकडे मिताली आणि सिद्धार्थने मनगटावर एकत्र टॅटू देखील काढले आहेत. त्यामुळे सिद्धार्थ आणि मितालीच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना चांगलाच ऊत आला होता.

siddharth chandekar mitali mayekar


मितालीच्या आधी सिद्धार्थ आणि रसिका सुनील यांच्या अफेअरची चर्चा होती. रसिका सुनिल सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनाया ही भूमिका साकारत आहे. रसिका सुनीलने शनायाची भूमिका मोठ्या खुबीने साकारली आहे. मौजमजा आणि धम्माल जीवन जगण्यासाठी गॅरी म्हणजेच गुरुनाथला आपल्याकडे आकर्षित करणारी शनाया ही भूमिका रसिकाने मोठ्या खुबीने रंगवली आहे. त्यामुळे शनाया या पात्रावर प्रेम करणारे आणि तिचा तिरस्कार करणारे असे दोन्ही प्रकारचे रसिक आहेत. 
काही महिन्यांपर्यंत रसिकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमधील अधिकाधिक फोटो हे अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत असायचे. एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असो किंवा मग एकत्र सिनेमाला जाणे असो, प्रत्येक क्षणाचे फोटो रसिकाने आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले होते. पण ते दोघे पूर्वीप्रमाणे सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करत नसल्याने त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचे म्हटले जात आहे. 

Also Read : ​सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांचा जुना फोटो पाहिला का?
Web Title: Siddharth Chandekar celebrates Valentine's Day with this Marathi actress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.