Shreya bugade did photoshoot for ujjawaltara brand | ओळखा का पाहु कोण आहे ही मराठीमोळी अभिनेत्री?, जिच्या पाठीवर आहे सुरेख टॅटू
ओळखा का पाहु कोण आहे ही मराठीमोळी अभिनेत्री?, जिच्या पाठीवर आहे सुरेख टॅटू

ठळक मुद्देश्रेया बुगडे आपल्या फॅशन सेन्सचे श्रेय आईला देतेश्रेयाने वयाच्या ८व्या वर्षी बालनाटयात काम केलं होते

चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे श्रेया बुगडे हे नाव घराघरात पोहोचले. सध्या श्रेया एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. श्रेयाने नुकतेच उज्वलतारा या हॅण्डलूम ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले. एक आदिवासी तरूणी, वनकन्या अशा बहुविधरंगी वेशभूषेत श्रेयाला पाहणे सुखद अनुभव आहे. 

श्रेया बुगडे आपल्या फॅशन सेन्सचे श्रेय आईला देते. श्रेयाच्या आईने फॅशन डिझाईनिंगचे कसलेही शास्त्रोक्त शिक्षण घेतलेले नसून निव्वळ निरीक्षणातून त्या पोषाख डिझाईन करायच्या. श्रेयाचे जवळपास सगळेच पोषाख त्यांनी डिझाईन केले आहेत. श्रेयाला स्वत:ला साडीमध्ये वावरणे जास्त आवडते. उज्वलतारामधील हॅण्डलूमच्या साड्या वापरणे कोणत्याही स्त्रिचं सौंदर्य खुलवण्यास पुरेसं आहे असं तिला वाटतं. 

श्रेयाने वयाच्या ८व्या वर्षी बालनाटयात काम केलं होते. शाळा-कॉलेजातून तिने अनेक कलाप्रकारांमध्ये काम करायला सुरूवात केली.  तू तिथे मी या मालिकेपासून तिचा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा झाला. तिला अनेकवेळा विनोदी मालिकेच्या ऑफर आल्या. तिने सुरुवातीला नकार दिला  पण तिने प्रयत्न केला आणि ती त्यात यशस्वी झाली.

 काही दिवांसपूर्वीच श्रेया  कानाला खडा या कार्यक्रमात आली होती. श्रेया तिच्याबद्दल आणि तिच्या स्वभावाबद्दल बोलताना म्हणाली, ''कि खऱ्या आयुष्यात आधीपासून खूप गंभीर आहे. ती शाळेत असल्यापासूनच खूप शिस्तप्रिय आणि एक उत्तम विद्यार्थी होती. सगळ्यांना खळखळून हसवणारी विनोदवीर हि खऱ्या आयुष्यात गंभीर होती हि गोष्ट संजय मोने यांना खरी वाटली नाही म्हणून त्यांनी पुरावा म्हणून तिच्या मावशीला बोलावलं. मावशीने श्रेयाच्या स्वभावाविषयी खुलासा केला तसंच तिचं निरीक्षण किती चांगलं आहे याबाबत देखील मावशी बोलल्या. थोडक्यात काय तर श्रेया खऱ्या आयुष्यात थोडीफार खोडकर आहे पण तितकीच निरागस देखील आहे.


Web Title: Shreya bugade did photoshoot for ujjawaltara brand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.