Shikari teaser with the curiosity of Marathi film lovers | ‘शिकारी’च्या टीजरने मराठी चित्रपट रसिकांची उत्सुकता शिगेला
‘शिकारी’च्या टीजरने मराठी चित्रपट रसिकांची उत्सुकता शिगेला
'शिकारी' या सिनेमा आधीही बोल्ड पोस्टरमुळेच अनेक मराठी सिनेमांची चर्चा झाली.'शटर','एडल्ट ओन्ली''चित्रफित' आणि 'न्युड' नुकताच प्रदर्शित झालेला 'गुलाबजाम' या सिनेमाचे पोस्टरसुद्धा बोल्ड आणि हॉट होते.यामुळे सिनेमाच्या शीर्षकाप्रमाणे बोल्ड पोस्टरमुळे या सिनेमाची चर्चा झाली.सिनेमाच्या पोस्टरचे महत्त्व आज चर्चेत आलं नसून गेल्या कित्येक वर्षांपासून पोस्टरने सिनेमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.जुन्या जमान्यापासून ते आजतागायत पोस्टरमधून सिनेरसिकांना आकर्षित करण्यात येते.सुरुवातीच्या काळात सिनेमाचे पोस्टर्स अत्यंत साधं मात्र तितकेच आकर्षक असायचे.मात्र कालांतराने पोस्टरचे चित्र पालटले असल्याचे पाहाला मिळत आहे.सिनेप्रेमींच्या थोडा आश्चर्याचा धक्का देणारा मराठी चित्रपट ‘शिकारी’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टर्सनी चांगलेच आव्हान दिले होते.या आठवड्यात या चित्रपटाचा जो टीजर प्रदर्शित झाला आहे.त्याने तर मराठी चित्रपट प्रेक्षकांमध्ये कमालीची जिज्ञासा निर्माण केली आहे.दिग्दर्शक महेश मांजरेकर जे काही करतात त्याची कायमच चर्चा होते.त्यांचा अभिनय असो किंवा मग त्यांनी दिग्दर्शित केलेला एखादा सिनेमा. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांची रसिकांची नेहमीच पसंती मिळते.त्यामुळेच सध्या सगळीकडे महेश मांजरेकर यांच्या आगामी 'शिकारी' या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने या आणखी एका प्रख्यात दिग्दर्शकाने केले आहे.महेश मांजरेकर यांचे चित्रपट हे वैविध्यपूर्ण कथानकासाठी ओळखले जातात तसेच ते एक वेगळी वाट चोखाळतात.त्याचमुळे मग ‘शिकारी’ हा सिनेमा एक हास्यपट आहे की सेक्स कॉमेडी आहे हे अजुन स्पष्ट झालेले नाही.याविषयी मराठी चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये झळकलेली सुंदर, बिनधास्त आणि सेक्सी अभिनेत्री ही नेहा खान असून शिकारी हा तिचा पहिला मराठी चित्रपट आहे.नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांना खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. 

शिकारी या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून हा टीझरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.सोशल मीडियावर या टीझरची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील नेहाची अदा अगदी घायाळ करून टाकणारी आहे. हा एक बोल्ड चित्रपट असल्याने मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा चित्रपट ठरणार अशी चर्चा सध्या तुफान रंगत आहे. शिकारी हा चित्रपट  20 एप्रिलला रसिकांच्या भेटीला येणार आहे.संतोष जुवेकर,कुशल बद्रीके, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव हे मराठी अभिनेते झळकणार आहेत.Web Title: Shikari teaser with the curiosity of Marathi film lovers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.