Shekhar Phadke will see what is there in this play | ​शेखर फडके झळकणार जे आहे ते आहे या नाटकात

शेखर फडकेने गेल्या अनेक वर्षांत अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्य काम केले आहे. त्याचे विनोदी टायमिंग प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यामुळे त्याला खूपच जास्त फॅन फॉलॉविंग आहे. त्याने नुकतेच सरस्वती या मालिकेत काम केले होते. 
या मालिकेत तिने साकारलेली भिकू मामाची भूमिका चांगलीच गाजली होती. शेखरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद देखील मिळत होता. पण अचानक त्याने या मालिकेला रामराम ठोकला. शेखरने ही मालिका सोडल्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. शेखरने ही मालिका का सोडली हे त्याच्या चाहत्यांना काही कळलेच नाही. सध्या त्याचे फॅन्स त्याला खूपच मिस करत आहेत. पण आता त्याच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. तो लवकरच एक नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आणत असून त्यासाठी तो सध्या जोरदार तयारी करत आहे. 
शेखर फडके हा एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक चांगला दिग्दर्शक देखील आहे. जो भी होगा देखा जाएगा या नाटकाचे दिग्दर्शन देखील त्यानेच केले होते. हे नाटक काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या नाटकात शेखरनेच मुख्य भूमिका साकारली होती. आता तो पुन्हा एकदा त्याच्या फॅन्ससाठी एक नवे नाटक घेऊन येत आहे. जे आहे ते आहे असे त्याच्या नाटकाचे नाव असून ते धमाल कौटुंबिक नाटक असणार आहे. तुमच्या घरातील प्रॉब्लेम विसरायला लावणारी तुमच्या घरातील कॉमेडी अशी या नाटकाची टॅगलाईन आहे.
जे आहे ते आहे या नाटकाचे दिग्दर्शन शेखर फडके करत असून या नाटकाचे लेखन शिरीष लाटकर यांनी केले आहे. या नाटकात शेखर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या नाटकात त्याच्याशिवाय सिद्धीरूपा करमरकर, अमोघ चंदन, स्मिता, ऐश्वर्या, धनश्री, सायली यांच्या मुख्य भूमिका आहेत.
जे आहे ते आहे या नाटकाद्वारे प्रेक्षकांचा दोन घटका फुल टाइमपास होणार आहे यात काहीच शंका नाही. हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  
Web Title: Shekhar Phadke will see what is there in this play
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.