Sharad Kelkar is my first love | ​शरद केळकर सांगतोय हेच आहे माझे पहिले प्रेम

शरद केळकरने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हलचल या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्याने सीआयडी या मालिकेतही काम केले होते. पण त्याला खऱ्या अर्थाने ओळख सात फेरे या मालिकेने मिळवून दिली. त्यानंतर तो सिंदूर तेरे नाम का, बैरी पिया, कुछ तो लोग कहेंगे यांसारख्या मालिकांमध्ये झळकला. त्याचसोबत त्याने रॉकी हँडसम, भूमी, बादशाहो यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. उत्तरायन, लय भारी यांसारख्या मराठी चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे तर प्रचंड कौतुक झाले होते. शरद हा खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच एक चांगला डबिंग आर्टिस्ट देखील आहे. बाहुबली द बिगिनिंग आणि बाहुबली द कन्क्ल्युजन यांसारख्या चित्रपटात त्याने प्रभाससाठी डबिंग केले होते. 
शरद आता अभिनय, डबिंग यानंतर आता एका वेगळ्या क्षेत्राकडे वळला आहे. इदाक या मराठी चित्रपटाची त्याने निर्मिती केली आहे. या चित्रपटाची निवड मामी फेस्टिव्हलमध्ये करण्यात आली आहे. शरदने निर्मिती केलेल्या पहिल्याच चित्रपटाने येवढे यश मिळवल्यामुळे तो सध्या चांगलाच खूश आहे. निर्मितीत मिळालेल्या यशाचा आनंद होत असला तरी त्याचे पहिले प्रेम हे अभिनयच आहे. त्याच्या या प्रेमाविषयी शरद सांगतो, मी या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटाला खूप चांगले यश मिळत आहे याचा मला आनंद होत आहे. पण निर्मिती क्षेत्रापेक्षाही अभिनयक्षेत्र हे मला अधिक जवळचे वाटते. या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर या चित्रपटाच्या कथेच्या मी प्रेमात पडलो होतो. त्यामुळेच या चित्रपटाची निर्मिती करण्याचे मी ठरवले. पण असे असले तरी माझ्या आयुष्यात नेहमीच मी अभिनयालाच प्राधान्य देणार.
या चित्रपटात उषा नाईक, स्नेहा वाघ, सुहास पळशीकर, संदीप पाटणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट काहीच महिन्याच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
शरद केळकरने प्रसिद्ध अभिनेत्री किर्ती केळकरसोबत लग्न केले असून त्यांना एक मुलगी देखील आहे. किर्ती कित्येक वर्षांनंतर ससुराल सिमर का या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर परतली आहे.  

Also Read : ​कोई लौट के आया है मालिकेच्या सेटवर सुरभी ज्योतीने केली चोरी
Web Title: Sharad Kelkar is my first love
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.