शाल्मली खोलगडेच्या 'या' गाण्याला दोन दिवसात लाखों लाईक्स, जाणून घ्या गाण्याची खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 11:30 AM2019-01-14T11:30:04+5:302019-01-14T11:56:32+5:30

'मैं परेशान', 'बलम पिचकारी', अगं बाई हल्ला मचाये रे', 'चढी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी' या आणि अशा अनेक बॉलिवूड साॅग्सवर सगळ्यांना ठेका धरायला लावणारा शाल्मलीचा आवाज आता आपल्याला मराठीत सुद्धा ऐकायला मिळतोय

Shalmali kholgade's this song got million likes in just two days | शाल्मली खोलगडेच्या 'या' गाण्याला दोन दिवसात लाखों लाईक्स, जाणून घ्या गाण्याची खासियत!

शाल्मली खोलगडेच्या 'या' गाण्याला दोन दिवसात लाखों लाईक्स, जाणून घ्या गाण्याची खासियत!

ठळक मुद्दे'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटात शाल्मलीने एक खास रोमँटिक गाणं गायलंय जे तुफान गाजतंय'हे मन माझे' हे गाणं शाल्मलीने तिच्यासाठी खूप स्पेशल असल्याचे सांगितलंय

'मैं परेशान', 'बलम पिचकारी', अगं बाई हल्ला मचाये रे', 'चढी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी' या आणि अशा अनेक बॉलिवूड साॅग्सवर सगळ्यांना ठेका धरायला लावणारा शाल्मलीचा आवाज आता आपल्याला मराठीत सुद्धा ऐकायला मिळतोय. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटात शाल्मलीने एक खास रोमँटिक गाणं गायलंय जे तुफान गाजतंय. केवळ दोनच दिवसांत फेसबुक आणि यूट्युबवर लाखांत मिळणारे लाईक्स आणि व्ह्युज् ने अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित 'कॉलेज डायरी' चित्रपटाची क्रेझ आणखी वाढली आहे.

 
 
गणेश-सुरेश या द्वयींनी शब्दबद्ध केलेल्या या मोहक गीताला संगीतकार रेवा यांनी मंद्र सप्तकात बांधलंय ज्याला शाल्मलीने आपल्या स्वरसाजाने योग्य तो न्याय दिलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लाईट हार्टेड म्युझिकचा उत्तम पीस असणारं हे गाणं प्रेक्षकांनाही प्रेमात पाडतंय. आपण नेहमीच शाल्मलीचा वरच्या पट्टीतला आवाज ऐकत आलो आहोत पण 'हे मन माझे' रसिकांना शाल्मलीच्या आवाजातला नटखट गोडवा ऐकण्याची संधी देतंय.'हे मन माझे' गाणं आपल्यासाठी खूप स्पेशल असल्याचं म्हणत, शाल्मलीने 'कॉलेज डायरी'च्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा ही दिल्या आहेत.


 

कॉलेजच्या मयूरपंखी दिवसांच्या आठवणी पुनुरुज्जीवत करणाऱ्या 'कॉलेज डायरी'ची कथा अनिकेत जगन्नाथ घाडगे यांनी लिहिली असून संवाद सुद्धा त्यांचेच आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन दूबाले पाटील असून या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, हेमलता रघू, जनार्दन कदम, शिवराज चव्हाण,शुभम राऊत,आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मन प्रसन्न करणारा 'कॉलेज डायरी' १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  

Web Title: Shalmali kholgade's this song got million likes in just two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.