Shadow Stage's Lokmat CNXLa Satat Interview | छाया कदम यांची लोकमत सीएनएक्सला सैराट मुलाखत

 Exclusive - बेनझीर जमादार

सैराट या चित्रपटातून आर्ची आणि परश्या यांचा संसार फुलविणाºया छाया कदम यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना हा पुरस्कार भिडू या चित्रपटासाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून देण्यात आला. मिलिंद शिंदे दिग्दर्शित भिडू हा आगामी चित्रपट आहे. त्यांचा आगामी चित्रपट भिडू, दादासाहेब फाळके पुरस्कार, सैराटचा फेव्हर आणि त्यांच्या बारावी नापासची चर्चा यासर्व गोष्टीं विषयी छाया कदम यांनी लोकमत सीएनएक्सशी साधलेला संवाद.

१. प्रत्येक कलाकराचे स्वप्न असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार तुम्हाला उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीसाठी मिळाला आहे यावेळी तुमच्या भावना काय होत्या?
- दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणे हे प्रत्येक कलाकाराचे  स्वप्न असते, आज हेच स्वप्न माझ्याबाबतीत पूर्ण झाले याचा मला खूप आनंद झाला. पुरस्कार मिळणे म्हणजे आपल्या कामाचे कौतुक होण्यासारखे असते. त्याचबरोबर आपल्या कामाची ही यशाची पावती देखील असते. आणि हे कौतुक जर राष्ट्रीय पातळीवर होत असेल तर हा आनंद व्दिगुणीत झालेला असतो. 

२. हा पुरस्कार प्राप्त झाला ही गोष्ट तुम्हाला कशी कळाली?
- पहिल्यांदा फोन करून एका अनोळखी माणसाने सांगितले की तुम्हाला असा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पण मला काही खरं वाटलं नाही. म्हणून मी भिडू या चित्रपटाच्या निर्मात्याला सांगितलं की कोणी मस्करी करतयं का खरचं हा पुरस्कार मिळाला हे चेक करा. त्यावेळी ते म्हटले की, खरंच तुम्हाला हा पुरस्कार प्राप्त झाला. माझ्या ध्यानीमनी ही नव्हतंअशी ही अनपेक्षित गोष्ट घडली.

३. तुम्हाला भिडू या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला या चित्रपटाविषयी काही कळेल का?
- विशेष मुलांवर आधारित भिडू हा चित्रपट आहे. मिलिंद शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच विशेष मुलाकडे नेहमीच वेगळया नजरेने पाहत असतो, पण ही मुले देखील काहीतरी वेगळं व भारी करू शकतात असं या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत.असाच आगळावेगळा चित्रपट प्रेक्षकांना भिडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल.

४. या चित्रपटात तुमची भूमिका काय होते?
- या चित्रपटात मी या विशेष मुलांच्या आईची भूमिका केली होती. यामध्ये ती तिचं मूल नसताना ही ती मोठया ताकदीने त्याला वाढविते. त्याला संघर्ष करायला शिकविते. कोणाच्या मदतीविना जगण्यास शिकविते. त्यामुळे माझ्या खूप जवळचा हा चित्रपट आहे.

५. या चित्रपटात तुम्ही खूप सायकल चालविली आहे असं ऐकलं?
- हो. ते पण नगरसारख्या रस्त्यांवर सायकल खूप चालविली आहे. सायकल चालविण्याचे हे शुट देखील लोकांना न सांगता शुट करायचे होते. एक ते दोन दिवस मी खूप गडबडले. त्या चढउतारावर पडले देखील. मग रिकाम्या वेळेत सायकल चालविण्याचा खूप सराव केला. यावेळेस मी एक ते दोन वेळा गुडघेदेखील फोडून घेतले.

६. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?
- या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख अजून काय ठरली नाही. खरं तर या सर्व गोष्टी निर्मात्यावर अवलंबून असतात. पण ज्यावेळ ठरेल त्यावेळी नक्कीच कळवेल.

७. सध्या तुमच्या बारावी नापासचे खूप चर्चा आहे याविषयी काय सांगाल?
- एवढया वर्षात जी गोष्ट मी लपवत होतो पण ती आज चर्चा झाली हे काय कळेना मला. खरं तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे. पण त्यावेळी मी खेळाच्या प्रेमात होते. पण अभ्यास हा केलाच पाहिजे. कारण नापास होणं म्हणजे एक वर्षे वाया जाते ही खूप मोठी गोष्ट आहे. पण समजा नापास झालाच तर आत्महत्येसारखा मार्ग निवडू नये. प्रयत्न करा त्याचे फळ नक्कीच मिळेल.

८. सैराट या चित्रपटात तुमची अककाची भूमिका ही जबरदस्त होती. मग चित्रपटाच्या यशाबद्दल काय सांगाल?
फॅन्ड्रीच्या यशामुळे हा चित्रपट ४० ते ५० कोटी पर्यत पोहोचेल अशी माझी कल्पना होती. पण सैराटचे अशा यशावर पोहोचला आहे की, एक माणूस सापडणार नाही की, ज्याने सैराट पाहिला नाही. पण या यशस्वी चित्रपटाचा भाग बनता आलं याचा फार अभिमान वाटतो. 


Web Title: Shadow Stage's Lokmat CNXLa Satat Interview
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.