Shadar Kelkar will be seen in the short film, shooting in Mumbai | शदर केळकर झळकणार शॉर्टफिल्ममध्ये, मुंबईत शूटिंग सुरू

भारदस्त आवाज आणि चोखंदळ, हरहुन्नरी अभिनेता आणि आपला सहज सुंदर अभिनय आणि एकसे बढकर एक भूमिकांमुळे शरद केळकरने आपली छाप रसिकांवर पाडली आहे.शरद केळकर आता अभिनय, डबिंग,निर्मिती यानंतर आता एका वेगळ्या क्षेत्राकडे वळला आहे.शरद केळकर सध्या एक शॉर्टफिल्मसाठी काम करत असल्याचे समजते आहे.मुंबईमध्येच या शॉर्टफिल्मचे शूटिंग सुरू अाहे.या शॉर्टफिल्ममध्ये त्याची नेमकी भूमिका काय हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. मध्यंतरी शरदने निर्मिती केलेल्या पहिल्याच 'इदाक' या मराठी चित्रपटाचे खूप कौतुकही झाले होते.निर्मितीत मिळालेल्या यशाचा आनंद होत असला तरी त्याचे पहिले प्रेम हे अभिनयच असल्याचे त्याने म्हटले होते. त्यामुळे आता शरदच्या या शॉर्टफिल्मची सा-यांनाचा उत्सुकता लागली असून शरद या शॉर्टफिल्ममध्ये काय कमाल करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.


शरद केळकरने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हलचल या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती.त्याने सीआयडी या मालिकेतही काम केले होते. पण त्याला खऱ्या अर्थाने ओळख सात फेरे या मालिकेने मिळवून दिली.त्यानंतर तो 'सिंदूर तेरे नाम का','बैरी पिया', 'कुछ तो लोग कहेंगे' यांसारख्या मालिकांमध्ये झळकला. त्याचसोबत त्याने रॉकी हँडसम, भूमी, बादशाहो यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. उत्तरायन, लय भारी यांसारख्या मराठी चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे तर प्रचंड कौतुक झाले होते. शरद हा खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच एक चांगला डबिंग आर्टिस्ट देखील आहे.'बाहुबली द बिगिनिंग' आणि 'बाहुबली द कन्क्ल्युजन' यांसारख्या चित्रपटात त्याने प्रभाससाठी डबिंग केले होते. 

शरद केळकरने प्रसिद्ध अभिनेत्री किर्ती केळकरसोबत लग्न केले असून त्यांना एक मुलगी देखील आहे. किर्तीलादेखील गेल्या काही वर्षांपासून अनेक मराठी मालिकांच्या ऑफर्स येत आहेत. पण तिची मुलगी लहान असल्याने तिने त्या भूमिका स्वीकारल्या नव्हत्या. पण आता ती पुन्हा अभिनयाकडे वळली आहे. संसार आणि काम यांच्यात ताळमेळ घालण्याचे तिने आता ठरवले आहे.  भविष्यात एखादी मराठी चित्रपटाची ऑफर आली आणि तिला पटकथा आवडली तर ती मराठी चित्रपटात नक्कीच झळकेल असे ती सांगते.

 
Web Title: Shadar Kelkar will be seen in the short film, shooting in Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.