School Time P.L. Deshpande Will be play this Actor in Bhai Vyakti ki Valli movie | ‘भाई व्यक्ती की वल्ली’मध्ये शालेय जीवनातील पु.लं.च्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता
‘भाई व्यक्ती की वल्ली’मध्ये शालेय जीवनातील पु.लं.च्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता

ठळक मुद्दे‘भाई व्यक्ती की वल्ली’ हा सिनेमा ४ जानेवारी २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीलासक्षम कुलकर्णी साकारणार शालेय जीवनातील पु.लं

‘भाई व्यक्ती की वल्ली’ या पु.लं देशपांडे यांची जीवनपट उलगडणाऱ्या सिनेमाचा दुसरा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात पु.लंच्या बालपणीच्या काळातील रंजक चित्रण या टीझरमध्ये पाहायला मिळते आहे. या सिनेमात फक्त अभिनेता सागर देशमुखच पु.लं साकारत नाही तर अभिनेता सक्षम कुलकर्णीने शालेय जीवनातील पु.लं साकारले आहेत. 

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व... व्यक्ती चित्रण किती खुश खुशीत असू शकते, कथेतील प्रत्येक पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात... हे ज्यांच्या लिखाण शैलीतून कळते... लिखाणाची शैली अशी अतरंगी की त्या व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडतो... हास्य आणि व्यंग यांचा अलौकिक ताळमेळ म्हणजे ही व्यक्ती... लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने  महाराष्ट्राचे भूषण होते... ज्यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच  नाटक, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले... आता खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे .. म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके पु.ल.देशपांडे..

वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत भाई – व्यक्ती की वल्ली चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत. या चित्रपटाचे संगीत अजित परब यांचे आहे. या चित्रपटामध्ये इरावती हर्षेने सुनीता बाईंची भूमिका साकारली आहे.
‘भाई व्यक्ती की वल्ली’ हा सिनेमा पुढील वर्षी ४ जानेवारी २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 


Web Title: School Time P.L. Deshpande Will be play this Actor in Bhai Vyakti ki Valli movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.