Sayami kher’s Rural look, this marathi gave her language lessons | 'माऊली’ सिनेमात सैयामी खेरचा गावरान अंदाज, या अभिनेत्याने दिले गावरान भाषेचे धडे
'माऊली’ सिनेमात सैयामी खेरचा गावरान अंदाज, या अभिनेत्याने दिले गावरान भाषेचे धडे

अभिनेत्री सैयामी खेरने मिर्जिया सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सिनेमातून सैयामीने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. आता सैयामी लवकरच माऊली या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सैयामी लय भारी अभिनेता रितेश देशमुखसह स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमात सैयामीचा गावरान अंदाज पाहायला मिळणार आहे. या सिनेमात गावातल्या तरूणीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी सैयामीने बरीच मेहनत घेतली आहे. सैयामी उत्तम मराठी बोलते. मात्र ही भूमिका साकारण्यासाठी तिला ग्रामीण लहेजा हवा होता आणि उच्चारही तसेच हवे होते. यासाठी सैयामीच्या मदतीसाठी धावून आला अभिनेता सिद्धार्थ जाधव. माऊली सिनेमात सिद्धार्थसुद्धा विशेष भूमिका साकारत आहे. त्यामुळे सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान सिद्धू आणि सैयामीची चांगलीच गट्टी जमली. दोघांनाही क्रीडा आणि भाषेत रस आहे आणि त्यामुळेच त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली.

जेव्हा जेव्हा सेटवर दोघांना मोकळा वेळ मिळाला त्यावेळी दोघं गप्पा मारता मारता भाषा आणि सिनेमातील गावरान उच्चाराच्या संवादावर अधिक काम करू लागले. सिद्धार्थने तिला यातील लहानसहान गोष्टी समजावून सांगितल्या आणि सैयामीनेही त्या समजावून घेत अंमलात आणल्या. सिद्धू-सैयामीची ही मेहनत ट्रेलरमॉध्ये पाहायला मिळतेय. सैयामी मराठी अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे.सैयामीने तिच्या आजीचे बरेच चित्रपट पहिलेत. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे अभिनेत्री तन्वी आझमी या सैयामीच्या आत्या आहेत आणि त्यांनी रितेशसोबत लय भारी मराठी सिनेमात काम केलं आहे. त्यामध्ये त्यांनी रितेशच्या आईची भूमिका वठवली होती. अभिनयाचा घरातून मिळालेला वारसा, सहकलाकारांची मदत आणि स्वतःची मेहनत यामुळे माऊली सिनेमातील सैयामीची भूमिका रसिकांना नक्कीच आवडेल. 

या सिनेमाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर समोर आलाय. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. माऊली सर्जेराव देशमुख असं त्या व्यक्तीरेखेचं नाव आहे. या ट्रेलरमध्ये गावातले गुंड धुमाकूळ माजवत असतात त्याचवेळी रितेश म्हणजेच माऊलीची एंट्री होते. इन्स्पेक्टर माऊली सर्जेराव देशमुख म्हणत्यात मला...आपल्या सारखा TERROR नाय.... असा त्याचा डायलॉग आहे. या ट्रेलरला अनेकांची पसंती मिळतेय. दबंग सलमान खानलाही हा ट्रेलर भावला आणि त्याचा मराठी बाणा जागा झाला. त्याने हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहलं की सर्वांचा माऊली आणि आपला भाऊ येतोय, एन्ट्री वर शिट्टी नक्कीच वाजवा… 


Web Title: Sayami kher’s Rural look, this marathi gave her language lessons
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.