Satyen took the blessings of Ustad Ghulam Mustafa Khan Saheb | सायलीने घेतला उस्ताद गुलाम मुस्ताफा खान साहेब यांचा आशिर्वाद

भारताचे नाव उंचावर पोहोचविणारे उस्ताद गुलाम मुस्ताफा खान साहेब यांची भेट होणे म्हणजे स्वर्ग मिळाल्यासारखे असल्याचे गायिका सायली पंकज हिने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले.  सायली म्हणाली, खान साहेब यांनी पद्मश्री, पद्मभूषण यांसारखे पुरस्कार प्राप्त केले आहे. अशा या ग्रेट आर्टिस्टबरोबर गाणं गाण्यास मिळणे म्हणजे करिअरला चार चाँद लागण्यासारखे आहे. त्यांच्यासोबत नुकतेच स्वातंत्र्यदिनानिमित्त जन-गण-मन हे राष्ट्रगीत गाण्याचा मान मिळाला. हे राष्ट्रगीत अकरा ओळींचे आहे. यामध्ये त्यांची मुलं, मी आणि त्यांचा शिष्य वर्ग आम्ही सर्वानी मिळून हे गाणं रेकॉर्ड केले आहे.  गुरूजींची ही भेट पंकजमुळेच जमवून आली आहे. पंकजचे गुरूजींच्या परिवाराशी खूप छान नाते आहे. तसेच  हे गाणं ज्यावेळी सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आले. त्यावेळी फार कमी कालावधीत दोन हजार लोकांनी हे गाणं शेअर केले आहे. यामध्ये बॉलिवुडचे तगडे गायक सोनू निगम, हरिहरन, शान या उस्तादजींच्या  शिष्यांचा  समावेश आहे.
Web Title: Satyen took the blessings of Ustad Ghulam Mustafa Khan Saheb
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.