Saraswati Fame Madhav Devchalke Chhalakan in the film | ​सरस्वती फेम माधव देवचक्के झळकणार चित्रपटात

सरस्वती या मालिकेतील कान्हा या व्यक्तिरेखेमुळे नावारूपाला आलेला माधव देवचक्के आता चित्रपटात झळकणार आहे. सरस्वती या मालिकेतील माधवने साकारलेली कान्हाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती. पण गेल्या काही महिन्यांपासून कान्हा मालिकेत दाखवला जात नाहीये. कान्हाला बाहेरगावी पाठवण्यात आले असल्याचा उल्लेख मालिकेत करण्यात आला होता. त्यामुळे प्रेक्षक त्यांच्या लाडक्या कान्हाला म्हणजेच माधव देवचक्केला खूप मिस करत आहेत. पण माधवच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. माधव लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तो सरस्वती या मालिकेत पुन्हा झळकणार आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाहीये. माधव एका वेगळ्याच भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
माधव देवचक्के आता एका चित्रपटात झळकणार असून त्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. माधवनेच सोशल मीडिया द्वारे त्याच्या फॅन्सना ही बातमी दिली आहे. माधवने फेसबुकला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो ज्येष्ठ अभिनेते परिक्षित सहानी यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहे. माधव टायनिंग टेबलवर सहानी यांच्यासोबत बसला असून एका दृश्याचे चित्रीकरण करत आहे. या फोटोसोबत माधवनेच हे एका चित्रपटाचे चित्रीकरण असल्याचे म्हटले आहे. त्याने फोटोसोबत मी एका चित्रपटाचे फिल्मशूट सहानी यांच्यासोबत गोरेगाव फिल्मसिटीमध्ये करत असल्याचे लिहिले आहे. त्याच्या या फोटोला त्यांच्या फॅन्सने भरभरून लाईक्स दिल्या असून अनेकांनी त्याला त्याच्या या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 
माधव देवचक्केने हमारी देवरानीसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. नुकताच तो मोह मोह के धागे या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. 
माधव देवचक्के चित्रपटात झळकणार ही त्याच्या फॅन्ससाठी खूप चांगली बातमी असली तरी सरस्वती या मालिकेत त्याचे कमबॅक कधी होणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागलेली आहे. त्याच्या कमबॅकची ते आतुरतेने वाट पाहात आहेत. 
Web Title: Saraswati Fame Madhav Devchalke Chhalakan in the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.