Salman Khan gave clap of the Marathi film Bonus | बोनस या मराठी चित्रपटाच्या मुर्हूताचा क्लॅप दिला सलमान खानने

सलमान खान हा बॉलिवूडचा दबंग खान असला तरी त्याचे मराठी चित्रपटसृष्टीशी देखील खूप चांगले संबंध आहेत. मराठीतील अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शन त्याचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्यासाठी तो मराठी चित्रपटांच्या मुर्हूताला, पार्ट्यांना हजेरी लावत असतो. रितेश देशमुखच्या लय भारी या चित्रपटात तर त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील साकारली होती. तसेच महेश मांजरेकर यांच्या एफयु या चित्रपटात त्याने गाणे देखील गायले होते. आता तर सलमानने एका मराठी चित्रपटाच्या मुर्हूताला हजेरी लावली असून या चित्रपटाच्या मुर्हूताचा क्लॅपदेखील दिला.
बोनस हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. बॉलिवूडचा टायगर सलमान खानने लायन क्राऊन एंटरटेनमेंट निर्मित ‘बोनस’ या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त संपन्न केला आहे. यावेळी त्याच्या सोबत लायन क्राऊन एंटरटेनमेंटचे गोविंद उभे, रतिश पाटील, संदेश पाटील आणि एम नितीन उपस्थित होते.
आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बोनस देऊ करणारे लायन क्राऊन एंटरटेनमेंटचे निर्माते या चित्रपटाविषयी बोलताना सांगतात, “बोनस हा शब्द आनंद आणि उत्साहाशी निगडीत आहे. आमच्या या चित्रपटाच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र बोनसचा आनंद आणि उत्साह साजरा करू शकेल. बोनस हा सिनेमा माणुसकीवर आधारित असून आयुष्यातील महत्त्वशील पैलूवर भाष्य करतो आणि सोबतच हा सिनेमा एक मजेशीर सफरही करून देईल एवढं मात्र नक्की.
मराठी सिनेसृष्टीत बोनस हा लायन क्राऊन एंटरटेनमेंटचा पहिलाच चित्रपट असला तरी त्यांनी हिंदी चित्रपट आणि अनेक हिंदी आणि मराठी  मालिकांची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा सौरभ भावे यांनी लिहिली असून या चित्रपटाचे छायाचित्र दिग्दर्शन संजय मेमाणे करणार आहेत. तर या चित्रपटाला संगीताचा साज रोहन -रोहन या तरुण संगीतकार जोडीने चढवला आहे. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे कलाकार या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात गश्मीर आणि पूजाची भूमिका काय असणार हे कळण्यासाठी त्या दोघांच्या फॅन्सना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Also Read : ​एकेकाळच्या ‘या’ जिगरी मित्रासोबत काम करण्यास सलमान खानने का दिला नकार?

 
Web Title: Salman Khan gave clap of the Marathi film Bonus
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.