Sai was once again on the rampwalker, her guess | सई पुन्हा एकदा अवतरली रॅम्पवॉकवर,असा होता तिचा अंदाज

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री कोण तर  सई ताम्हणकर हे नाव ओघाने आले नाही तरच नवल.एका फॅशन शोमध्ये 'सलीम असगरली' या लेबलचे समर्थन करताना दिसून अाली. एवढंच नाही, तर सई फॅशन शो ची शो-स्टॉपर सुद्धा होती.सईने चित्रपटसृष्टीत अगदी कॉलेजला जाणारी मुलगी ते बोल्ड अँड ब्युटीफुल वूमन पर्यंत अनेक पात्र साकारली आहेत.सईचा रॅम्पवॉक हा कोणत्या सुपर मॉडेल पेक्षा कमी नव्हता. तिची अदा खरोखरच घायाळ करून टाकण्यासारखी होती.सई ने पुन्हा एकदा दाखवून दिलं, कि कोणतेही काम ती अगदी सहजपणे करू शकते ती फक्तं एक उत्तम अभिनेत्री नव्हे तर एक सुपर मॉडेल म्हणून सुद्धा तितकीच कमाल असल्याचे नुकत्याच झालेल्या तिच्या रॅम्पवॉक मुळे सिद्ध झाले आहे.

 सईचं हे वर्ष नक्कीच स्टाईलच्या बाबतीत नक्कीच वैविध्यपूर्ण राहिलं, सईने २०१७ च्या संपूर्ण वर्षात कोणकोणत्या प्रकारचे वैविध्यपूर्ण पोशाख वापरले हे  जाणून घेण्यासाठी तिचे २०१७ चे सगळे कॉस्ट्यूम्स एकत्र पाहाता येतील असं  'लुक बुक' इंटरनेटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 'सई ताम्हणकर लुक बुक ऑफ २०१७' पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:- http://www.dreamerspr.com/saitamhankarlookbook/ २०१८ मध्ये सई  ताम्हणकर  वर्षाच्या सुरुवातीलाच तिच्या चाहत्यांसाठी 'राक्षस' हा एक वेगळ्या कन्सेप्टचा चित्रपट घेऊन येतेय. २०१७ च संपूर्ण वर्ष सई सिल्वर स्क्रीन पासून दूर राहिली, तरी तिचे वर्षभराचे सगळेच पब्लिक अँपिअरन्सेस ग्लॅमरस आणि स्टयलिश राहिलेत. सईच्या ह्या अपडेटेड स्टाईल स्टेटमेंटची दाखल नक्कीच  घेतली गेली जेव्हा सईला 'लोकमत मोस्ट स्टायलिश दिवा' हा अवॉर्ड दिला गेला. २०१७  फेमिना फॅशन नाईटची शो स्टॉपर म्हणून तिने आपलं फॅशन जगतातलं वजन नक्कीच वाढवलं.  


अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांच्या कॉम्पेटिशनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.मग त्यांचे अगदी 'फिगर इन' राहणं असो किंवा रेड कार्पेटवर एकसे बढकर एक स्टाईल स्टेटमेंट करणं दोघीही सध्या एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे.परंतु ह्या दोघी एकत्र पब्लिक अँपिअरन्स देतानाही दिसत आहेत.नुकतंच एका बॉलिवूड फॅशन ब्लॉगरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ह्या दोघीनी एकत्र उपस्थिती लावली.सगळ्याच बॉलिवूड स्टार्स आणि चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सर्वांची फेव्हरेट असणाऱ्या  मिस मालिनीच्या पुस्तक सोहळ्यात मराठीतल्या दोन हॉट फेव्हरिट्सने हजेरी लावली होती.मिस मालिनी बॉलिवूड विश्वातली एक नावाजलेली फॅशन ब्लॉगर आहे. अगदी शाहरुख खान, अक्षय कुमार पासून  विद्या बालन, इरफान खान सर्वच बॉलीवूड सेलिब्रिटी मिस मालिनीच्या मुलाखतीमध्ये, सोशल मीडियावर विशेष उपस्थिती लावतात. प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आवर्जून 'मिस मालिनी'ची भेट घेतात.काही दिवसांपासून मराठीतल्या ह्या दोन कलाकारांची विशेष उपस्थिती जाणवली ती मिस मालिनीच्या सोशल मीडियावर जाणवत आहे.

Web Title: Sai was once again on the rampwalker, her guess
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.