Sai Tamhankar went to London Indian Film Festival! | सई ताम्हणकर निघाली लंडन भारतीय फिल्म फेस्टिव्हलला !

आपली फॉरिन फिल्म लव सोनिया ह्या सिनेमासाठी अभिनेत्री सई ताम्हणकर लंडनला निघाली आहे. लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलचे ओपनिंग सईच्या ‘लव सोनिया’ फिल्मने होणार आहे. लव सोनियामध्ये एका महत्वाच्या भूमिकेत दिसणारी सई सिनेमाच्या स्क्रिनींगसाठी लंडनला रवाना होतानाचा मुंबई आंततराष्ट्रीय विमानतळावरचा हा फोटो आहे. 

लाइफ ऑफ पाय आणि स्लमडॉग मिलीनियर ह्या सिनेमाचे निर्माते तबरेज नुरानी ह्यांनी लव सोनिया ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. लव सोनिया सिनेमामध्ये सई ताम्हणकर सोबत राजकुमार राव, रिचा चढ्ढा, मनोज वाजपेयी, अनुपम खेर हे बॉलीवूड स्टार आणि डेमी मोर आणि फ्रिडा पिंटो ह्या हॉलीवूड अभिनेत्री दिसणार आहेत.  लव सोनिया हा चित्रपट मानवी तस्करी व त्याची क्रूर वास्तिवकता या संवेदनशील विषयावर आधारित असल्याने अभिनेत्यांची निवड करताना आतापर्यंतच्या त्यांच्या अभिनयाचा मागोवा घेतला होता. 

लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलची ओपनिंग फिल्म असलेल्या लव सोनियाबद्दल सई सांगते, “एका सशक्त मुलीची ही कथा आहे. बागरी लंडन फिल्म फेस्टिवल ह्या एका महत्वपूर्ण फिल्म फेस्टिवलचे ओपनिंग ह्या फिल्मने होते आहे. ह्या फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातले सिनेरसिक येतात. त्यामूळे ही नक्कीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”  सई ताम्हणकरच्या लव सोनिया सिनेमाचे शूटिंग मुंबई, जयपूर, हाँगकाँग आणि लॉस एंजलिसमध्ये झाले आहे. लवकरच सप्टेंबरमध्ये ही फिल्म रिलीज होईल.  

नुकताच सईला 'आउटस्टेंडिंग कॉन्ट्रिब्युशन इन फिल्म्स' पुरस्काराने गैरविण्यात आले आहे.सॅव्ही पुरस्कार मिळणारी ती मराठीतली पहिली अभिनेत्री आहे. सईने आपल्या दहा वर्षांच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या करीयरमध्ये जवळजवळ 50 चित्रपट केले अनेक नावाजलेले पुरस्कार मिळाल्यावर आता सॅव्ही पुरस्कारानेही तिचा गौरव झाला.

 
Web Title: Sai Tamhankar went to London Indian Film Festival!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.