सई ताम्हणकरचा ट्रेडिशनल लूक पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 07:15 AM2019-07-11T07:15:00+5:302019-07-11T07:15:00+5:30

सई ताम्हणकर नेहमीच आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंना घेऊन सोशल मीडियावर चर्चेत असते. सई सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.

Sai tamhankar share her traditional look photo | सई ताम्हणकरचा ट्रेडिशनल लूक पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा

सई ताम्हणकरचा ट्रेडिशनल लूक पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा

googlenewsNext

सई ताम्हणकर नेहमीच आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंना घेऊन सोशल मीडियावर चर्चेत असते. सई सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सईने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने बेबी पिंक कलरचा ड्रेस परिधान केला आहे. सई या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसतेय. तिचा हा ट्रेडिशनल लूक फॅन्सना ही भावला आहे. 

सई लवकरच वैभव तत्त्वादीसोबत 'पाँडेचेरी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे.सचिन कुंडलकर आणु तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.

याशिवाय सई ललित प्रभाकर आणि  पर्ण पेठेसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सई पहिल्यांदाच ललित सोबत काम करताना दिसणार आहे. सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. 

Web Title: Sai tamhankar share her traditional look photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.