सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 06:00 AM2018-11-12T06:00:00+5:302018-11-12T06:00:02+5:30

अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना 'लव्ह यु जिंदगी' च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट मिळाली आहे.

Sachin Pilgaonkar and prarthana behere starer love you zindagi marathi movie teaser | सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

googlenewsNext
ठळक मुद्देप्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी अनिरुद्ध दाते म्हणजेच सचिन पिळगांवकर यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसते, त्यासाठी गरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी लागणारं एक गोड धाडस हा संदेश हा चित्रपट देणार आहे.

तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणाऱ्या अनिरुद्ध दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना 'लव्ह यु जिंदगी' च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट मिळाली आहे. हटके विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट असून एक वेगळा प्रवास या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे.

प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे टीझरमध्ये दाखवण्यात आले असून सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवी जोडी म्हणजेच कविता लाड आणि सचिन पिळगांवकर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.

'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर हे लक्षात येते की, सचिन पिळगांवकर साकारत असलेल्या अनिरुद्ध दाते या व्यक्तिरेखेचे वयाच्या बाबतीत फारच वेगळे मत आहे. जसे की, ते त्यांच्या वाढत्या वयाच्या सत्याला स्वीकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगू शकतो असे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळणार आहे. असा हा विनोदी, भावनात्मक आणि रोमांचकारी कथा असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही.

दिग्दर्शक आणि सिनेनिर्मिते या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की, आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसते, त्यासाठी गरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी लागणारं एक गोड धाडस.

एस पी प्रोडक्टशन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बामगुडे यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केले आहे तर त्यांनीच कथा देखील लिहिली आहे.

कौटुंबिक मनोरंजन करणारा  'लव्ह यु जिंदगी' हा चित्रपट येत्या १४ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Sachin Pilgaonkar and prarthana behere starer love you zindagi marathi movie teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.