Rupali Bhosale says, 'whose next?' | रुपाली भोसले म्हणतेय, 'व्हूज नेक्स्ट'?
रुपाली भोसले म्हणतेय, 'व्हूज नेक्स्ट'?

ठळक मुद्दे'व्हूज नेक्स्ट' एक सस्पेन्स थ्रिलर लघुपट

प्रेमाचा गुलाबी रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. खास करून व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तर हा रंग खूपच बहरतो. मात्र या रंगाला बट्टा लावणाऱ्या अनेक घटना समाजात घडतात. प्रेम भंग आणि फसवणुकीमुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होते, त्यामुळेच तर प्रेम करा पण जरा जपून, असेच काहीसे मराठी आणि हिंदीच्या छोट्या पडद्यावर झळकलेली अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या लघुपटाद्वारे सांगणार आहे. 'व्हूज नेक्स्ट' या लघुपटाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असलेला 'व्हूज नेक्स्ट' एक सस्पेन्स थ्रिलर असलेला लघुपट आहे. हा एक स्त्रीप्रधान लघुपट असून, रुपालीने यात मायरा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या लघुपटाद्वारे आम्ही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचे ती सांगते. बलात्कार, अ‍ॅसिड हल्ला, छेडछाड यांसारख्या घटना वाढत आहे. अशावेळी मुलींनी काय केले पाहिजे? वर्षानुवर्षे कायद्याच्या कचाट्यात अडकून न्यायाच्या प्रतीक्षेत बसावे की अजून काही ठोस पाऊले उचलावी ? यावर हा लघुपट भाष्य करणार आहे.

प्रेम आंधळे नव्हे तर डोळस करण्याची आवश्यकता असल्याचा संदेश या लघुपटाद्वारे रुपाली देते आहे. अभिजित चौधरी लिखित आणि दिग्दर्शित 'व्हूज नेक्स्ट ?' हा लघुपट युट्यूबवर पाहता येणार आहे. 
रुपालीचा 'व्हूज नेक्स्ट ?' हा लघुपट पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 


Web Title: Rupali Bhosale says, 'whose next?'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.