Ritwik centers say love is trust | ऋत्विक केंद्रे म्हणतो, प्रेम म्हणजे विश्वास

प्रेम म्हणजे डोळे झाकुन केलेला विश्वास. नातं कोणतंही असो, आई- मुलाचं, वडील-मुलगी किंवा नवरा बायकोचं असो. नात्यात जर विश्वास असेल तर ते प्रेम सफल होतं. प्रेमात डोळे झाकून केलेला विश्वास हि त्या प्रेमाची सगळ्यात मोठी ताकद असते असे मत अभिनेता ऋत्विक केंद्रेने व्यक्त केले आहे.  प्रेम हे दोघांमध्ये निर्माण झालेलं एक रेशमी नातं असून याला समजूतदारपणा, आदर यांची झालर असते. आदर आणि विश्वास या दोन गोष्टींशिवाय प्रेमाचीच काय पण कोणत्याही नात्याची परिभाषा आपल्याला करता येणार नाही असे ऋत्विक सांगतोय. आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा आपला कामावरचा राग किंवा फ्रस्टेशन हे आपल्या जवळच्या व्यकितवर निघतो, हे असं न करता आपण एकमेकांशी बोलून यावरचे उपाय शोधले पाहिजेत असे  ऋत्विकचे म्हणणे आहे.  

ऋत्विक हा  सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे आणि अभिनेत्री गौरी केंद्रे यांचा मुलगा आहे. त्याने पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' या चित्रपटातून गतवर्षी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. मानसीचा चित्रकार तो मालिकेतून घराघरात पाहोचलेल्या 'विहान'ने 'ड्राय डे'मध्ये  'अजय' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तरुणाईवर आधारीत हा चित्रपट होता. या चित्रपटात ऋत्विक आणि मोनालिसासह  कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाटगे, चिन्मय कांबळी हे तरुण कलाकार आणि अरुण नलावडे, जयराम नायर हे कलावंतदेखील आपल्याला बघायला मिळाले होते. या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक संजय पांडुरंग जाधव यांनीच केले होते तर नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले होते.
Web Title: Ritwik centers say love is trust
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.