रिंकूला रुपेरी पडद्यावर आर्ची साकाराण्यासाठी लागला होता तब्बल एवढा कालावधी, अशी घेतली होती मेहनत

By गीतांजली | Published: April 20, 2019 08:00 AM2019-04-20T08:00:00+5:302019-04-20T08:00:00+5:30

'सैराट' सिनेमातील प्रेमकथेतून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आर्चीने अक्षरश: वेड लावले. रिंकू राजगुरु हे नाव सैराटनंतर घराघरात पोहोचले.

Rinku Rajguru took one and half year to become archi | रिंकूला रुपेरी पडद्यावर आर्ची साकाराण्यासाठी लागला होता तब्बल एवढा कालावधी, अशी घेतली होती मेहनत

रिंकूला रुपेरी पडद्यावर आर्ची साकाराण्यासाठी लागला होता तब्बल एवढा कालावधी, अशी घेतली होती मेहनत

googlenewsNext
ठळक मुद्दे आर्ची साकारायला मी जवळपास दीड वर्ष मेहनत घेतली होती

'सैराट' सिनेमातील प्रेमकथेतून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आर्चीने अक्षरश: वेड लावले. रिंकू राजगुरु हे नाव सैराटनंतर घराघरात पोहोचले. सैराटसाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कारदेखील पटावला. सैराटनंतर तब्बल तीन वर्षांनी रिंकू राजगुरुची प्रमुख भूमिका असलेला कागर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रिंकूशी साधलेले हा दिलखुलासा संवाद.

राणीची भूमिकेसाठी साकारण्यासाठी तुला काही वेगळी तयारी करावी लागली का ?
राणीच्या भूमिकेला अनेक छटा आहेत. तिच्या आणि माझ्यात थोडं साम्य आहे कारण आम्ही दोघेही गावाकडे वाढलेल्या आहोत. गावाकडे मुलांनी खूप बंधन असतात. त्यांना घराबाहेर पडताना डोक्यावर पदर, अंगावर ओढणी आणि खाली नजर अशी अनेक बंधनत असतात. राणी ही युवराजवर खूप प्रेम करणारी, त्याच्या कामात मदत करणारी, धाडसी आत्मविश्वासी तिच्या मतावर ठाम असणारी पण विचार करुन निर्णय घेणारी आहे. एक वळणावर अशी परिस्थिती येते की तिला उंबरठा ओलांडावा लागतो आणि तिला कागर फुटतो. ती राजकारणातील स्त्री नेतृत्व करणारी महिला आहे जी गावाकडच्या स्वप्न पाहणाऱ्या मुलींच्या पंखांना बळ देणारी. त्यांच्या मागे उभी राहणारी. ही भूमिका साकारताना मला थोडं कठीण गेले कारण राणी ही एक राजकारणी आहे आणि माझा तसा राजकारणाशी काहीच संबंध नाही. त्यामुळे तिचं बोलणं, राहाणं, सभेमध्ये भाषणं करताना हातवारे हे सगळं माझ्यासाठी आव्हानात्मक होते. राणी साकारण्यासाठी मी विशेष अभ्यास केला.

ही भूमिका साकारण्यासाठी तु कोणत्या महिला नेतृत्वाला फॉलो केलंस का ?
मी कुणा एका व्यक्तिला फॉलो नाही केलं मी प्रत्येकाचं निरीक्षण करत होते. कारण मला पडद्यावर राणी उभी करायची होती. मला कोणाला कॉपी नव्हते करायचे. राणी एक स्वतंत्र मताची, स्वतंत्र विचारांची, निर्णयाची मी उभी केली आहे. 

तुझ्यापर्यंत ही भूमिका कशी आली आणि तुझी कथा ऐकल्यांनतरची पहिली प्रतिक्रिया काय होती ?
मकरंद सरांनी मला या सिनेमाची कथा वाचून दाखवली आणि मला ती आवडली. सिनेमातील छोट्याशा भूमिकेचे सुद्धा आपला एक प्रवास आहे. नात्याची गंमत आहे जी हळूहळू उलगडत जातंय. शेतकऱ्यांवरील प्रश्न, सामाजिक समस्या, राजकारण, प्रेम, मैत्री हे सगळं या सिनेमात आहे. त्यामुळे मला असे वाटले प्रेक्षकांसमोर येण्याचे कागर हे एक सुंदर माध्यम आहे. कारण मला असे वाटते तुम्ही प्रेक्षकांसमोर जेव्हा सिनेमा घेऊन जाता तेव्हा त्यातून त्यांना काही तरी सिनेमातून मिळाला पाहिजे. यातील सगळ्याच गोष्टी सुंदर आहेत ज्या मला कागरच्या माध्यमातून पोहोचवायच्या होत्या. 

तुला करिअरच्या सुरुवातीला दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली याबाबत काय सांगशील ?
मला दोघांकडून खूप काही शिकायला मिळाला. दोघे ही फार संवेदनशील दिग्दर्शक आहेत. कलाकारांना मोकळेपणाने करुन काम करुन घेतात. खूप चांगले मार्गदर्शन करतात. काम व्यतिरिक्तसुद्धा अनेक गोष्टींसाठी मार्गदर्शन करतात. सेटवरच वातावरण खूपच हलकं फुलकं ठेवतात. त्यामुळे दोघांसोबत सुद्धा काम करायला खूप मजा येते.   

सैराटनंतर जवळपास तीन वर्षांनी तू कागर सिनेमात काम करतेस तर कागरचं का, या मागचे काही खास कारण आहे का ? 
सिनेमाचे दिग्दर्शक उत्तम हवा, त्याचे दिग्दर्शन उत्तम हवं. कथा चांगली असेल तर नाही म्हणण्याचा प्रश्न येतंच नाही. माझ्याकडे सैराटनंतर अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या पण त्या सगळयांना पुन्हा सैराटच करायचा होता आणि सगळ्यांना मला घेऊन  पुन्हा आर्ची करायची होती आणि मला पुन्हा अर्ची साकारायची नव्हती. कारण आर्ची साकारायला मी जवळपास दीड वर्ष मेहनत घेतली होती. कागर हा सिनेमा यासाठी निवडला कारण यात सगळंच आहे. कागरची कथा, दिग्दर्शन आणि माझी भूमिका या सिनेमाच्या माध्यमातून लोकांना संदेशदेखील जातोय त्यामुळे मी कागरची निवड केली. 

सैराट ते कागर या दरम्यानच्या तुझ्या प्रवासकडे तू कशी बघतेस ?
मला या गोष्टीचा आनंद आहे की मला हे यश लहान वयात मिळालं हे मिळवण्यासाठी कलाकारांना त्यांचे आयुष्य खर्च करावं लागतं. मी लहान वयात घराघरात पोहोचले आहे. मला लोक ओळखतात, प्रेमाने येऊन भेटतात. मला लोकाकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात त्यामुळे मला खूप आनंद होतो. हा पण कधी कधी याचा अतिरेकसुद्धा होता. उदाराहण द्यायचे झाले तर माझा परीक्षा केंद्रावर होणारी गर्दी, मला पेपरला न जाऊन देणं, मला तिकडे गराडा घालणं या सगळ्यामुळे इतर मुलांदेखील त्रास होतो. त्यामुळे मला असे वाटतं तिकडे मला थोडीशी स्पेस द्यायला हवी.

Web Title: Rinku Rajguru took one and half year to become archi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.