Rina Agarwal's upcoming movie is based on the truth | रिना अग्रवालचा आगामी सिनेमा सत्य घटनेवर आधारित

अभिनेत्री रिना अग्रवालचा नवा मराठी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. देव देव्हा-यात नाही असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाची खास बात म्हणजे हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचे आता समोर येत आहे. या सिनेमाच्या कथेबाबत अधिक स्पष्ट आणि सविस्त सांगण्यास रिना अग्रवालनं नकार दिला असला तरी हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगायलाही ती विसरली नाही. या सिनेमाची कथा अत्यंत भावनिक असून स्क्रीप्ट ज्यावेळी ऐकवण्यात आली त्यावेळी ती ऐकून अक्षरक्षा रडू कोसळल्याचं रिनानं सांगितलं आहे. तसंच असाच अनुभव सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी आल्याचंही रिना सांगायला विसरली नाही. त्यामुळे देव देव्हा-यात नाही हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकल्यानंतर त्याची कथा रसिकांच्या काळजाला नक्की भिडेल असा विश्वास रिना अग्रवालनं व्यक्त केलाय.या सिनेमाआधी रिनाने अजिंठा आणि झाला बोभाटा या मराठी सिनेमातही भूमिका साकारल्या आहेत.मराठीसह बॉलिवूड सिनेमामध्येही रिनानं भूमिका साकारल्या आहेत.काही महिन्यांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'बहेन होगी तेरी' या हिंदी सिनेमात रिनाची भूमिका होती.यांत रिनासह अभिनेता राजकुमार राव आणि श्रृती हसन यांच्याही भूमिका होत्या. हा सिनेमाही आपल्यासाठी विशेष असल्याचं रिनानं सांगितलं. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसह काम करताना ब-याच गोष्टी शिकायला मिळतात.या सिनेमाच्या शुटिंगवेळी नवीन गोष्टी शिकायला आणि अनुभवण्यास मिळाल्याचं रिनानं सांगितलं आहे. रुपेरी पडद्यावरील या भूमिकांमुळे रिनाकडे छोट्या पडद्याच्याही ऑफर्स येऊ लागल्या आहेत. छोट्या पडद्यावरील क्या मस्त है लाइफ आणि एजंट राघव- क्राईम ब्रांच या मालिकांसाठी निर्मात्यांनी रिनाशी संपर्क साधला आहे. त्यामुळे रुपेरी पडदा आणि छोटा पडदा गाजवत रसिकांच्या मनात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी रिना उत्सुक आहे. 
Web Title: Rina Agarwal's upcoming movie is based on the truth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.