Responding to the Diwali issue readers | दिवाळी अंकाला वाचकांचा भरभरुन प्रतिसाद

यावर्षी झी मराठीने पहिल्यांदाच आपला दिवाळी अंक ‘उत्सव नात्यांचा’ बाजारात आणला. एखाद्या मनोरंजन वाहिनीने दिवाळी अंक प्रकाशित करण्याची ही पहिलीच वेळ. झी मराठी वाहिनीने नुकतीच अठरा वर्षे पूर्ण केली. या अठरा वर्षांच्या काळात झी मराठी वाहिनीसोबत अनेकांचे ऋणानुबंध घट्ट झाले आहेत. ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आणि अक्षरधारा तथा बुकगंगाच्या साह्याने वितरीत करण्यात आलेल्या या अंकाची पहिली आवृत्ती अवघ्या तीन दिवसांत संपली आहे. अनेक ठिकाणी वाचकांना अंक उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्या पदरी पडणारी निराशा टाळण्यासाठी आता झी मराठी वाहिनीने या अंकाची दुसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत हा अंक बाजारात उपलब्ध होणार असून छोट्या छोट्या शहरांत आणि गावांत तो कसा वितरीत करता येईल यासाठी वाहिनी प्रयत्नशील असणार आहे.
झी मराठीच्या पहिल्या दिवाळी अंकाची घोषणा झाल्यापासूनच या अंकात काय वाचायला मिळेल याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता होती. ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात या दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलं आणि त्यानंतर आठवड्याभरातच हा अंक बाजारात आला. अवघ्या तीन दिवसांत पन्नास हजार अंक विकल्या गेले. यामध्ये केवळ राज्यातूनच नाही तर देशाच्या विविध भागांमधून आणि परदेशातूनही ऑनलाईन पद्धतीने अंक मागविणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. 

मराठी मनोरंजन क्षेत्रात लोकप्रिय असलेले अनुभवी कलाकार सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर, रवी जाधव, संजय मोने, संजय जाधव, सुकन्या मोने, हृषिकेश जोशी यांनी आपले या क्षेत्रातील अनुभव, त्यांची जडण घडण , त्यांचा संघर्ष, झी सोबत असलेलं नातं याबद्दलच्या अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. याशिवाय भारतकुमार राऊत, नितीन वैद्य, माधवी मुटाटकर ज्यांनी झी मराठीचा पाया रचला अशा मंडळींनीही झी मराठीचे सुरुवातीचे दिवस कसे होते याबद्दल सविस्तर लेख लिहिले आहेत. याशिवाय सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर, प्रिया बापट, उमेश कामत, डॉ. निलेश साबळे या आजच्या पिढीच्या कलाकारांचेही अनेक रंजक अनुभव यातून वाचायला मिळणार आहेत. याशिवाय हास्य धम्माल, झी मराठीची शीर्षकगीतं, बदलतं मनोरंजन क्षेत्र यांसारख्या विविध विषयांवरील लेखांचा यात समावेश 
Web Title: Responding to the Diwali issue readers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.