४ वर्षांनी लहान असलेल्या या खास व्यक्तीसह रेशमनं लुटला स्विमिंगचा आनंद, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 08:00 AM2018-11-19T08:00:00+5:302018-11-19T08:00:00+5:30

रेशम ही संदेशपेक्षा वयाने ४ वर्षांनी मोठी आहे. रेशम ४२ वर्षांची तर संदेश ३८ वर्षांचा आहे. या दोघांचे अनेक फोटो रेशमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळतात. 

Resham tipnis spotted enjoying swimming with this special person of her life who is 4 year younger | ४ वर्षांनी लहान असलेल्या या खास व्यक्तीसह रेशमनं लुटला स्विमिंगचा आनंद, पाहा फोटो

४ वर्षांनी लहान असलेल्या या खास व्यक्तीसह रेशमनं लुटला स्विमिंगचा आनंद, पाहा फोटो

googlenewsNext

मराठी बिग बॉस या रिअॅलिटी शोनंतर रेशम टिपणीस हे नाव मराठी रसिकांच्या चर्चेचा विषय बनलं. हिंदी आणि मराठी सिनेमा तसंच मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी रेशम मध्यंतरीच्या काळात तितकी चर्चेत नव्हती. मात्र बिग बॉस हा मराठी रिअॅलिटी शोमधील एंट्रीने रेशम पुन्हा रसिकांच्या मनात घर करुन गेली. त्यामुळेच की काय तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. मराठी बिग बॉसचा सीझन संपल्यानंतर रेशम लगेचच 'वस्त्रहरण' या नाटकाशी जोडली गेली आहे. या नाटकात ती एक लक्षवेधी भूमिका साकारत आहे. एक बिनधास्त जीवन जगणारी अशी रेशमची ओळख आहे. आपल्या रिलेशनशिपबाबतही रेशम तितकीच बिनधास्त आहे. 

संदेश किर्तीकरसह असलेल्या रिलेशनशिपची तिने उघडपणे कबुलीही दिली आहे.नुकतेच हे लव्हबर्ड्स गोव्यात एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळालं. गोव्यातील रिसॉर्टमधील एका स्विमिंग पूलमध्ये दोघं एकत्र वेळ घालवत असताना दिसून आलं. एकमेकांच्या सहवासात दोघंही आनंदित असल्याचे पाहायला मिळालं.

 

संदेेश हा खासगी आयुष्यातील सर्वात स्पेशल व्यक्ती असल्याचे रेशमने बिग बॉस शोमध्ये सांगितलं होतं. रेशम ही संदेशपेक्षा वयाने ४ वर्षांनी मोठी आहे. रेशम ४२ वर्षांची तर संदेश ३८ वर्षांचा आहे. या दोघांचे अनेक फोटो रेशमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळतात. 

 

रेशमच्या इन्सटाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की रेशम तिच्या फिटनेसबाबत जागरुक आहे आणि त्यामुळेच की काय रेशमचे सौंदर्य आजही अबाधित आहे.  तिच्या फोटोंकडे पाहिले असता तिच्या वयाचा अंदाज बांधणं कुणालाही शक्य नाही. फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी रेशम बरीच मेहनत घेते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळालं. या फोटोला तिने कॅप्शनही दिली होती. स्वतःला वॉटर बेबी म्हणत नेहमीच पोहायला आवडतं असं तिने या कॅप्शनमधून सांगितलं होतं. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांक़डून खूप सा-या कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षावही झाल्याचे पाहायला मिळाले होते.

Web Title: Resham tipnis spotted enjoying swimming with this special person of her life who is 4 year younger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.