For this reason, Umesh Kamat kept Priya Bapat for six months for marriage, what was the reason? | ‘या’ कारणामुळे उमेश कामतने प्रिया बापटला लग्नासाठी सहा महिने ताटकळत ठेवलं, कोणते होते ते कारण?

प्रेमाला कशाचीच बंधनं नसतात. ना भाषेची, ना जातीचं ना धर्माचं, ना अन्य कोणत्याही गोष्टीचं. प्रेमात महत्त्वाचं असते ते फक्त आणि फक्त दोन व्यक्तींचं एकमेकांवर असलेले प्रेम. आपल्या प्रियकर-प्रेयसीवर जीवापाड प्रेम करणारी अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. ब-याचदा भाषा, जाती-धर्म यासोबतच प्रेमात असताना वयातील फरकाचीही पर्वा केली जात नाही. या गोष्टीला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या किंवा वयाने कितीतरी वर्षे लहान असणा-या व्यक्तीशी सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकल्याची विविध उदाहरण आपल्याला या चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रात पाहायला मिळतात. अशाच सेलिब्रिटींपैकी मराठी चित्रपटसृष्टीतील मोस्ट लव्हेबल आणि क्यूट कपल म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. प्रिया आणि उमेश गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात काम करतायत. त्यामुळे दोघांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता आणि त्यामुळेच दोघांमध्ये मैत्रीचे बंधही निर्माण झाले. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. मात्र एकमेकांवर असणा-या प्रेमाची कबुली पहिली देणार कोण यामुळे काहीशी अडचण झाली. अखेर प्रियाने आपलं उमेशवर असलेले प्रेम व्यक्त केले. मात्र उमेश या प्रेमाच्या नात्याला लग्नाच्या रुपात बदलण्याबाबत साशंक होता. याला कारण म्हणजे उमेश आणि प्रिया यांच्यातील वयाचं अंतर. दोघांच्या वयात आठ वर्षांचे अंतर आहे. उमेश प्रियापेक्षा आठ वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे लग्नाबाबत होकार द्यायला त्याने एक दोन नाही तर तब्बल सहा महिन्याचा वेळ घेतला.खुद्द प्रियानेच याबाबतची माहिती एका मुलाखतीत दिली आहे. या सगळ्या कालावधीत आपण स्वतःला लंपट समजू लागल्याचेही तिने गंमतीने म्हटलं होते.मात्र सहा महिन्यांनंतर का होईना उमेशने लग्नाला होकार दिला आणि ऑक्टोबर-2011 साली दोघंही रेशीमगाठीत अडकले.     


Also Read:Good news! ​प्रिया बापटच्या आयुष्यात आगमन झाले या खास व्यक्तीचे
Web Title: For this reason, Umesh Kamat kept Priya Bapat for six months for marriage, what was the reason?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.