या कारणामुळे महेश मांजरेकर यांनी भेट दिली आदित्‍य सरपोतदारला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 06:46 PM2019-03-19T18:46:11+5:302019-03-19T18:47:35+5:30

मराठी चित्रपटसृष्‍टीचे सुप्रसिद्ध दिग्‍दर्शक आदित्‍य सरपोतदार सध्‍या वूटवरील आगामी वेब सिरीजचे दिग्‍दर्शन करत आहेत. नुकतेच त्‍यांचा जिवलग मित्र महेश मांजरेकर यांनी आदित्‍य यांना भेटत त्‍यांना अचंबित केले.

For this reason Mahesh Manjrekar visited Aditya Sarpotdar | या कारणामुळे महेश मांजरेकर यांनी भेट दिली आदित्‍य सरपोतदारला

या कारणामुळे महेश मांजरेकर यांनी भेट दिली आदित्‍य सरपोतदारला

googlenewsNext
ठळक मुद्देशूटिंगचे कामकाज आणि व्‍यस्‍त शेड्यूल्‍समध्‍ये आदित्‍य आपला मित्र प्रख्‍यात अभिनेता, दिग्‍दर्शक व निर्माता महेश मांजरेकर यांना वूटच्‍या सेटवर भेटले. सेटवर मांजरेकर यांनी सेटवरील संपूर्ण कलाकार व टीमला शुभेच्‍छा दिल्‍या.

सध्या चित्रपट, मालिकांइतकेच वेबसिरीजला देखील चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग आहे. त्यामुळे मराठी, हिंदी कलाकार देखील मोठ्या संख्येने या क्षेत्राकडे वळले आहेत. मराठी आणि हिंदीत सध्या खूपच चांगल्या वेबसिरीज येत आहेत.

मराठी चित्रपटसृष्‍टीचे सुप्रसिद्ध दिग्‍दर्शक आदित्‍य सरपोतदार सध्‍या वूटवरील आगामी वेब सिरीजचे दिग्‍दर्शन करत आहेत. नुकतेच त्‍यांचा जिवलग मित्र महेश मांजरेकर यांनी आदित्‍य यांना भेटत त्‍यांना अचंबित केले. शूटिंगचे कामकाज आणि व्‍यस्‍त शेड्यूल्‍समध्‍ये आदित्‍य आपला मित्र प्रख्‍यात अभिनेता, दिग्‍दर्शक व निर्माता महेश मांजरेकर यांना वूटच्‍या सेटवर भेटले. सेटवर मांजरेकर यांनी सेटवरील संपूर्ण कलाकार व टीमला शुभेच्‍छा दिल्‍या.

मजेशीर बाब म्‍हणजे अतुल कुलकर्णी देखील वूट ओरिजिनल सिरीजमध्‍ये प्रमुख भूमिका साकारत आहे. सेटवर या तिघांनीही चर्चा करत एकमेकांसोबत मजेशीर क्षणाचा आनंद घेतला.
 
शोबाबत आपले मत व्‍यक्‍त करत अतुल म्‍हणाला, ''ही भारतीय ओटीटी क्षेत्रासाठी बनवण्‍यात आलेली अनोखी कौटुंबिक थ्रिलर सिरीज आहे.''

अतुल कुलकर्णी, अश्विनी भावे, पारूल गुलाटी आणि नील भूपलम असे प्रतिष्ठित कलाकार असलेल्‍या या वूट ओरिजिनल थ्रिलर सिरीजमध्‍ये मराठी, हिंदी चित्रपटसृष्‍टीमधील प्रतिभावान कलाकारांचा भरणा आहे. गोव्‍यामध्‍ये शूटिंग करण्‍यात आलेली ही वेब सिरीज या मनोरंजनपूर्ण ग्रुपच्‍या अद्वितीय अभिनयासह थरारक अनुभव देण्‍यासाठी सज्‍ज आहे फक्‍त वूटवर.

Web Title: For this reason Mahesh Manjrekar visited Aditya Sarpotdar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.