This is the reason for Maharashtra's success! | या कारणामुळे सई ठरली महाराष्ट्राची फेव्हरेट!

मराठी फिल्म इंडस्ट्रीला ग्लॅमर आणणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच स्टाईल आयकॉन राहिली आहे.तरुणाईने तिचे अनेक ट्रेंड्स फॉलो केलेत आणि तिचे अनेक फॅशन स्टेटमेंट्स चर्चेचा विषय ठरलेत.हिंदी,तामिळ चित्रपटातून तिने तिचा तामिळ आणि हिंदी चाहत्यांचा वर्ग निर्माण केला.तिच्या अशा उत्कृष्ट कामगिरीला गौरविण्यासाठी ह्या वर्षीचा 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' हा पुरस्कार एक खास निमित्त ठरले.यात अभिनेत्री सई ताम्हणकरने दोन पुरस्कार पटकावले आहेत.विशेष म्हणजे सईला या पुरस्कारासाठी तीन विभागात नामांकने मिळाले होते.त्यात 'जाऊ द्या ना बाळासाहेब' या चित्रपटासाठी महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री,'फॅमिली कट्टा' चित्रपटासाठी फेव्हरेट सहाय्यक अभिनेत्री आणि 'फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर' यासाठी तिला नामांकने होती.त्यातील 'फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर' आणि 'महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री' यासाठी तिला पुरस्कार मिळाला आहे.हा अवॉर्ड स्वीकारताना देखील सई ताम्हणकर अवॉर्डला साजेसा असाच पेहराव करून आली होती.यावेळी ती नेहमीप्रमाणे स्टायलिश दिसत होती. 
  
डबल धमाका असे दोन अवॉर्ड मिळाल्या बाबत सई म्हणते,"हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे,मी खूप खुश आहे कि प्रेक्षकांनी 'जाउ द्याना बाळासाहेब'ह्या चित्रपटातली माझ्या भूमिकेवर प्रेम केलं आणि महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री म्हणून गौरवलं तसेच महाराष्ट्राचा फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाल्यानंतर माझी जबाबदारी आणखी वाढते आणि मला हे दोन अवॉर्ड मिळवून दिल्याबद्दल माझ्या चाहत्यांना खूप खूप धन्यवाद".प्रेक्षक आणि समीक्षकांनी केलेलं कौतुक आणि अभिनयातील कुशलपणा यामुळे सईने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले एक घट्ट स्थान निर्माण केलेलं आहे.महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं प्रेम यामुळे सईसाठी 2018चं उतरार्ध वर्ष खूप खास ठरलं आहे.तसेच सध्या सई,समित कक्कड दिग्दर्शित 'राक्षस' चित्रपटाच्या प्रोमोशन मध्ये व्यस्त आहे.तसेच कार्यक्रमात 'राक्षस' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला.

२०१८ मध्ये सई  ताम्हणकर वर्षाच्या सुरुवातीलाच तिच्या चाहत्यांसाठी 'राक्षस' हा एक वेगळ्या कन्सेप्टचा चित्रपट घेऊन येते.२०१७चं संपूर्ण वर्ष सई सिल्वर स्क्रीन पासून दूर राहिली,तरी तिचे वर्षभराचे सगळेच पब्लिक अँपिअरन्सेस ग्लॅमरस आणि स्टायलिश राहिलेत.सईच्या ह्या अपडेटेड स्टाईल स्टेटमेंटची दाखल नक्कीच घेतली गेली जेव्हा सईला 'लोकमत मोस्ट स्टायलिश दिवा' हा अवॉर्ड दिला गेला.२०१७  फेमिना फॅशन नाईटची शो स्टॉपर म्हणून तिने आपलं फॅशन जगतातलं वजन नक्कीच वाढवलं आहे. 

Web Title: This is the reason for Maharashtra's success!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.