रणवीर सिंग आणि रोहित शेट्टीने असे दिले सिद्धार्थ जाधवला सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 04:45 PM2018-10-25T16:45:29+5:302018-10-25T17:03:00+5:30

यंदाचा वाढदिवस सिद्धार्थ जाधवसाठी खूप स्पेशल होता. सिद्धार्थ जाधव सध्या रोहित शेट्टीची सिम्बा सिनेमात काम करतोय.

Ranveer Singh and Rohit Shetty gave Surprise to Siddharth Jadhwa | रणवीर सिंग आणि रोहित शेट्टीने असे दिले सिद्धार्थ जाधवला सरप्राईज

रणवीर सिंग आणि रोहित शेट्टीने असे दिले सिद्धार्थ जाधवला सरप्राईज

googlenewsNext
ठळक मुद्देसिम्बाच्या कलावंतांकडून सिद्धार्थला मिळालं सरप्राइज

यंदाचा वाढदिवस सिद्धार्थ जाधवसाठी खूप स्पेशल होता. सिद्धार्थ जाधव सध्या रोहित शेट्टीचीसिम्बा सिनेमात काम करतोय. या सिनेमाच्या सेटवर एक्शन मॅन रोहित शेट्टी, सुपरस्टार रणवीर सिंग आणि सिम्बाच्या कलावंतांकडून सिद्धार्थला सरप्राइज मिळालं.  दिवाळी साजरी करतात, तसा त्याचा वाढदिवस सेटवर साजरा करण्यात आला. 

सिम्बाच्या सेटवर उपस्थित असलेल्या सूत्रांनुसार, सिद्धार्थ मुळत:च खूप मस्तीखोर आणि मनमिळावू आहे. सिद्धार्थसारखाच रणवीरही आहे. त्यामुळे अर्थातच दोघांची सेटवर पटकन बॉन्डिंग झाली. रोहत शेट्टीलाही सिद्धार्थमधली उत्स्फुर्तता खूप आवडते. त्यामुळे रोहितचाही तो खूप लाडका आहे. त्यात सेटवर ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन अनेक मराठी कलावंत काम करतात. त्यामूळे आपल्या लाडक्या ‘सिद्धू’चा वाढदिवस जोशात करायचं सर्वांनी ठरवलं. दिवाळीसारखा अगदी फटाके वगैरे वाजवत, सिद्धार्थचा वाढदिवस साजरा झाला.

अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणतो, “माझ्या भावना व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत. हे सर्व माझ्यासाठी स्वप्नवत आहे. रोहितसर, रणवीर आणि सिंबाच्या संपूर्ण टिमने दिलेल्या ह्या प्रेमाने मी एकदम कृतकृत्य झालो. ह्या प्रेमाची उतराई करणे शक्य नाही. मी सर्वांचा अत्यंत आभारी आहे.” 

सिम्बा' हा  चित्रपट साऊथच्या 'टेम्पर' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र 'सिम्बा'मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. सिम्बा या चित्रपटात रणवीरपहिल्यांदा पोलिस कर्मचा-याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातून सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. येत्या २८ डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.  

Web Title: Ranveer Singh and Rohit Shetty gave Surprise to Siddharth Jadhwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.